शाश्वत उपजीविकेसाठी सुक्ष्म नियोजनाची गरज!

By admin | Published: February 16, 2017 12:44 AM2017-02-16T00:44:45+5:302017-02-16T00:44:45+5:30

महिलांच्या दैनंदिन जीवनातील श्रमाचे मुल्य जाणून घेऊन त्यांना पुरक असणाऱ्या उपजीविकांचे सुक्ष्म नियोजन करून ....

Need for micro planning for sustainable living! | शाश्वत उपजीविकेसाठी सुक्ष्म नियोजनाची गरज!

शाश्वत उपजीविकेसाठी सुक्ष्म नियोजनाची गरज!

Next

एम.डी. सिंह : जीवनोन्नती अभियान आढावा बैठक
चंद्रपूर : महिलांच्या दैनंदिन जीवनातील श्रमाचे मुल्य जाणून घेऊन त्यांना पुरक असणाऱ्या उपजीविकांचे सुक्ष्म नियोजन करून उपजीविकेची व्यावसायिक सांगड घातल्यास शाश्वत उपजीविका मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. याकरिता प्रत्येक स्वयंसहायता समूहाचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या आढावा सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्ह्याच्या आढावा सभेत मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी (मनरेगा) अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिंह यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्याचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर अद्यावत नोंदी करणे, विविध विभागातील समूहाकरिता योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कृतीसंगम आराखडा तयार करण्याचे निर्देश दिलेत. तसेच जिल्ह्यातील शौचालय बांधकाम आणि त्याचा वापर यांचे वाढणारे प्रमाण लक्षात घेता ग्रामसंघाद्वारे आरएसएमद्वारे मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामास वेग येऊन जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास मदत होईल. आणि ग्रामसंघास उत्पन्नाचे साधन मिळेल असे ते म्हणाले.
तसेच यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात २ ते ६ मार्चला आयोजित विभागीय प्रदर्शनीकरिता स्वयंसहायता समुहातील उत्पादन समुहांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, सुचना करण्यात आल्यात.
शिक्षण विभागाद्वारे प्रगतशाळा योजनेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ३२ इंच अन्ड्राईड टेलीव्हिजन दातृत्व भावनेतून देण्यात याव्या. आणि याबाबतचा प्रचार, प्रसार करण्याबाबतचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिंह यांनी केले. जिल्ह्यातील सर्व विभागातील कामाचे माहितीपत्रक काढून मार्च, अखेरपर्यंत सर्व माहितीपत्रकाचे वार्षिक अहवाल स्वरूपात तयार करण्याचे सर्व विभाग प्रमुखांना सुचित केले. या आढावा सभेत महाराष्ट्र राज्य ग्रमीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी केले. तर उपस्थिताचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी संगीता रायपुरे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

नियोजन करण्याचे निर्देश
महिलांच्या स्वयंसहायता समूहांना फिरता निधी देणे, बँकेद्वारे खाते उघडणे, गरजेनुसार बँक जोडणी करून समूहांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणे, ज्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांना सुमती सुकळीकर उद्योगिनी योजनेद्वारे कर्जावरील व्याजामध्ये अनुदान प्राप्त होईल. यासोबतच प्रत्येक समूहाचे बांधणी करतेवेळी भविष्यातील उपजीविकेबाबत चर्चा करून सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उपस्थित संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि उमेद चमूला दिले.

Web Title: Need for micro planning for sustainable living!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.