यश संपादनासाठी जिद्द व चिकाटीची आवश्यकता
By admin | Published: February 12, 2017 12:44 AM2017-02-12T00:44:28+5:302017-02-12T00:44:28+5:30
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक आहे.
हेमराजसिंग राजपूत : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनवर्गाचे उद्घाटन
चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध सामान्य ज्ञाना पुस्तकांचे वाचण वर्तमानपत्राचे नियमीत वाचण त्याचबरोबर अवांतर वाचनाने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणे सहज शक्य आहे. असे मौलिक मंत्र अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. संदेश पाथर्डे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपअधीक्षक हेमराजसिंग राजपूत पुढे म्हणाले, मला एक चांगला प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे असे स्वत:ला सांगत रहा, स्वत:शी स्पर्धा करून मुळ उद्देश विकसीत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांमधील समुह संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे नियमीत एकमेकांशी संवाद साधावा.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले यांनी अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरतील असा विश्वास व्यक्त करून यातूनच चांगले प्रशासकीय अधिकारी घडतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संचालन डॉ. सपना वेगीनवार तर आभार प्रा. संदेश पाथर्डे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रकाश बोरकर, प्रा. सुनिल चिकटे, प्रा. प्रफुल्ल वैद्य, प्रा. संदीप गुडेल्लीवार, गुरूदास शेंडे, आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)