प्राणवायुसाठी वृक्षारोपण करणे गरजेचे : रत्नमाला भोयर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:38+5:302021-06-06T04:21:38+5:30
मूल : कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूअभावी कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले. भविष्यात प्राणवायूची कमतरता भरून काढायची असेल तर प्रत्येकाने ...
मूल : कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूअभावी कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले. भविष्यात प्राणवायूची कमतरता भरून काढायची असेल तर प्रत्येकाने प्राणवायू देणारे वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब या वृक्षाचे रोपण आपल्या परिसरात करणे गरजेचे आहे, असे मत मूल नगर परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले.
त्या भाजपा महिला आघाडी व जिजाऊ ब्रिगेड मूलच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मूलच्या नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस व जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष संजीवनी वाघरे, कार्यकर्ता अर्चना चावरे, कल्पना मेश्राम, लीना बद्देलवार, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव चौथाले उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका प्रभा चौथाले यांनी प्रभाग क्र. ८ चे राहिवासी रेवनाथ भुरसे व श्रीधर निमगडे यांचा सत्कार केला. वा
वॉर्डातील रस्त्यावर आणि ओपनस्पेसमध्ये वड व पिंपळाची झाडे लावण्यात आली. संचालन प्रभा चौथाले यांनी केले. उपस्थितांचे आभार सारिका वासेकर यांनी मानले.