यशस्वी जीवनासाठी बौध्द धर्माच्या आचरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:41+5:302020-12-28T04:15:41+5:30
नवरगाव : तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माचे आचरण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारले. राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ...
नवरगाव : तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माचे आचरण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारले. राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या विज्ञानवादी धम्माचे आचरण केल्यास मानवाचा विकास साधण्याची संकल्पना मिळते, असे प्रतिपादन प्रदिप लोणारे यांनी केले.
धम्मभूमी विकास सेवा समिती उमा नदी घाट रत्नापूर-नाचनभट्टी- शिवणीच्या वतीने एक दिवसीय धम्म मेळावा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चंदन नगराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल मेंढे, रोशन मेंढे, सदाशिव मेश्राम, धम्मभूमी विकास सेवा समितीचे अध्यक्ष गजानन मेश्राम, देवानंद मेश्राम, भारती रामटेके, रंजीत मेश्राम, सागर रामटेके, बंडु खोब्रागडे, पुजा खोब्रागडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन मेश्राम, संचालन वामन रामटेके तर आभार महेंद्र कोवले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.