जिल्ह्यात ७२ ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर स्कायवॉकची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:33 AM2021-02-05T07:33:14+5:302021-02-05T07:33:14+5:30

स्काय वॉकची निर्मिती झाल्यास पादचाऱ्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. यामुळे संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येणे शक्य हाेणार आहे. ...

Need for skywalks on busy roads at 72 places in the district | जिल्ह्यात ७२ ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर स्कायवॉकची गरज

जिल्ह्यात ७२ ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यावर स्कायवॉकची गरज

Next

स्काय वॉकची निर्मिती झाल्यास पादचाऱ्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. यामुळे संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येणे शक्य हाेणार आहे.

जिल्ह्यात नागपूर - चंद्रपूर मार्गावरील वरोरा येथील आनंदवन चौक, रत्नमाला चौक, नंदोरी, भद्रावती टप्पा, बसस्थानक परिसर, घोडपेठ, ऊर्जाग्राम, मोरवा, पडोली, चंद्रपूर येथील कुंदन प्लाझा चौक, गजानन महाराज चौक, जनता कॉलेज चौक, प्रियदर्शिनी चौक, बसस्थानक परिसर, वीर सावरकर चौक, चंद्रपूर - नागभीड मार्गावरील नागभीड येथील ब्रह्मपुरी जोड रस्ता, तळोधी बाळापूर, सिंदेवाही शिवाजी चौक, राजोली, मूल - सोमनाथ जोड रस्ता, अजयपूर, चिचपल्ली, मुल - चामोर्शी मार्गावरील खेडी फाटा, चंद्रपूर - आलापल्ली मार्गावरील बंगाली कॅम्प, बायपास जोड रस्ता, विसापूर, बॉटनिकल गार्डन गेट, बल्लारपूर येथील कला मंदिर चौक, पेपर मिल गेट, बसस्थानक परिसर, नगरपरिषद परिसर, रेल्वे स्टेशन चौक, बामणी टी पॉईंट, येनबोडी, कोठारी, करंजी, गोंडपिपरी येथील जुना बस स्टॉप परिसर, मूल जोड रस्ता, विठ्ठलवाडा राजुरा - आसिफाबाद मार्गावरील बसस्थानक परिसर, पंचायत समिती चौक, देवाडा, लक्कडकोट, राजुरा आदिलाबाद मार्गावरील राजुरा येथील नाका नंबर तीन, सास्ती टी पॉईंट, अंबुजा टी पॉईंट, गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट गेट मार्ग चौक, बसस्थानक परिसर, सावित्रीबाई फुले विद्यालय चौक, लालगुडा, वनसडी, कोरपना बसस्थानक परिसर, पारडी, कोरपना - वणी मार्गावरील तांबडी फाटा, हेटी, वरोरा - चिमूर मार्गावरील भटाळा, शेगाव बुद्रुक, मेसा, खडसंगी, चिमूर येथील बालाजी मंदिर परिसर, भिसी जोड रस्ता, चिमूर - ब्रह्मपुरी मार्गावरील जांभुळघाट, कानापा टेम्पा, किरीमिटी मेंढा, ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद चौक, ब्रह्मपुरी - वडसा मार्गावरील बसस्थानक चौक, ब्रह्मपुरी - आरमोरी मार्गावरील मुख्य मार्केट जोड रस्ता, रेल्वे स्थानक जोडमार्ग, चिमूर - गडचिरोली मार्गावरील नवरगाव, पाथरी, मूल - गडचिरोली मार्गावरील सावली, वरोरा - वणी मार्गावरील साई मंगल कार्यालय चौक, कुचना, पाटाळा आदी स्थळावरील वर्दळीच्या मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टिकोनातून स्कायवॉकची निर्मिती होणे गरजेची आहे. याचा फायदा वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांना होईल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी प्रारूप आराखडा तयार करून स्काय वॉक तयार करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Need for skywalks on busy roads at 72 places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.