समाजोपयोगी उपक्रमांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:50 PM2019-04-01T22:50:39+5:302019-04-01T22:51:05+5:30
समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समाजातील विधवा, विधुर, पीडित महिलांच्या अडचणी कुणी जाणून घेत नाही. अशा महिला-पुरूषांना संस्थेकडून नवीन जीवन जगण्याची आशा पल्लवीत होणार आहेत. यासारखे उपक्रम राबविणे गरजचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री राखी सावंत यांनी केले.
ह्मुमन वेलफयर मल्टीपर्पज असोसिएशनच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सर्वधर्मीय परिचय संमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी ताहेरा शेख पाशा तर प्रमुख अतिथी म्हणून जावेश पाशा, अधि. फरहत बेग, अंकुश आगलावे, अश्विनी खोब्रागडे, अधि. किशोर पुसलवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत संस्थाध्यक्ष शाहीस्ता खान पठाण यांच्याव्दारे पाच वर्षांपासून चालविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. यावेळी शहिस्ता खान पठाण म्हणाल्या, विवाहाच्या कार्यक्रमासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येतात. परंतु, समाजात अनेक द्रारिद्र्य रेषेखालील असलेला समाजातील कुटुंबीय हा खर्च पूर्ण करू शकत नाही. ही मोठी समस्या सोडविण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न केल्या जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच दरवर्षी असाच उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दोन जोडपे विवाहबद्ध
यावेळी सर्वधर्म विवाह परिचय मेळाव्यात दोन जोडप्यांचा धार्मिक रिती रिवाजानुसार लग्न सोहळा पार पडला. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी नवजोडप्यांना आशीर्वाद दिला. सदर उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. सिनेतारिका सावंत यांनी पुढील वर्ष सदर कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले.