कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:09 PM2018-12-21T23:09:22+5:302018-12-21T23:10:06+5:30

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

The need to take care for cotton cultivation | कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हाधिकारी कार्यालयात जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक ए. व्ही. भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, फरदड कापूसमुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहभागी व्हावे. मोहिमेचे स्वरूप व्यापक करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पदाधिकाºयांनी सहभागी करून अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.
शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्याविरूद्ध जागृती केल्याने शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाददिला. यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये शेतकºयांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी यंत्राच्या अनुदानासाठी १५ जानेवारी २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूसमुक्त गाव अभियान विषयावरील भित्तीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.
बोंडअळीच्या उच्चाटणासाठी उपाय
पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटी व व्यवस्थित न उपडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पालापाचोडा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनिंग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. कपाशीच्या पऱ्हाठीत सुप्त अवस्थेत बोंडअळी राहते. ही पऱ्हाठी गंजी करुन बांधावर ठेवू नये. त्या पिकाचा चुरा करण्यासाठी ग्रेडर यंत्राचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: The need to take care for cotton cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.