ध्येयवादी पत्रकारिता काळाची गरज

By admin | Published: January 11, 2017 12:42 AM2017-01-11T00:42:57+5:302017-01-11T00:42:57+5:30

देशात पत्रकारावरील हल्ले वाढतच चालले असून भ्रष्टाचारी प्रवाहाला पायबंद घालण्यासाठी ध्येयवादी पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, ..

The need for timely journalistic journalism | ध्येयवादी पत्रकारिता काळाची गरज

ध्येयवादी पत्रकारिता काळाची गरज

Next

श्रीधर बल्की : मामूलवार, एकनाथराव साळवे यांचा सत्कार
राजुरा : देशात पत्रकारावरील हल्ले वाढतच चालले असून भ्रष्टाचारी प्रवाहाला पायबंद घालण्यासाठी ध्येयवादी पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार श्रीधरराव बल्की यांनी केले.
राजुरा तालुका पत्रकार संघ, राजुराच्या वतीने किसान भवन येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक पत्रकार सुनील देशपांडे म्हणाले, वृत्तपत्र सृष्टीतील बहुतांश पत्रकार आदर्श, कल्याणकारी व समाज हिताची विचारात्मक व सकारात्मक पत्रकारिता करणारे आहेत.
पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यू. बोर्डेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव डॉ. उमाकांत धोटे, कार्याध्यक्ष विनायक देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीन पुरस्कार देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा जेष्ठ पत्रकार सन्मान श्रीधर बल्की यांना देऊन गौरव करण्यात आला. स्व. राघवेंद्रराव देशकर ग्रामीण वार्ता पुरस्कार लोकमतचे वार्ताहर प्रकाश काळे, स्व. महियर गुंडेविया शहर वार्ता पुरस्कार पत्रकार मोहन शर्मा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक रमेश नळे, राधेश्याम अडानिया, उज्ज्वला जयपूरकर, दिलीप डेरकर, प्रिती रेकलवार, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.सुरेश उपगन्लावार, माजी नगरसेवक प्रा.अनिल ठाकुरवार, डॉ. भुपाळ पिंपळशेंडे, आनंद भेंडी उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळ सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The need for timely journalistic journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.