कोरपनातील त्या परिसरात वृक्षारोपणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:08+5:302021-05-24T04:27:08+5:30
प्रशासकीय भवनात तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, तालुका कृषी अधिकारी, उपकोषागार अधिकारी कार्यालय व शासकीय गोदाम आहे. येथे कामानिमित्त ...
प्रशासकीय भवनात तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक, तालुका कृषी अधिकारी, उपकोषागार अधिकारी कार्यालय व शासकीय गोदाम आहे. येथे कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना विसाव्यासाठी कुठलेच स्थान नाही. त्यामुळे संरक्षण भिंतीजवळ चौफेर व दक्षिण बाजूतील पडीक जागेवर वृक्षलागवड केल्यास परिसर हिरवागार होईल. याचप्रमाणे, क्रीडा संकुल व ग्रामीण रुग्णालय परिसर येथील संरक्षण भिंतीच्या चौफेर वृक्षलागवड झाल्यास खेळाडू व रुग्ण यांना विसाव्यासाठी चांगले स्थळ निर्माण होईल, या शिवाय परिसराचे सौंदर्यही खुलेल. त्यामुळे संबंधित विभागांनी येत्या पावसाळ्यात वृक्षलागवडीच्या संदर्भात नियोजन करून हा परिसर पर्यावरण पूरक करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याचा फायदा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने होईल. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.