समाज विकासासाठी संघटित होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:00 AM2019-02-08T00:00:21+5:302019-02-08T00:01:12+5:30
तेली समाजाची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, समाज संघटीत नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी तेली समाज बांधवानी संघटित होणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपूरचे येष्ठ उपाध्यक्ष प्रा. बबनराव फंड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उपरी : तेली समाजाची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, समाज संघटीत नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी तेली समाज बांधवानी संघटित होणे काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज नागपूरचे येष्ठ उपाध्यक्ष प्रा. बबनराव फंड यांनी केले.
सावली तालुक्यातील उपरी येथे श्री संताजी बहुउद्देशीय प्रसारक तेली समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सव व समाज प्रबोधन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, रघुनाथ शेंडे जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, गंगाधर कुनघाडकर, महासचिव दिवाकर पा. भांडेकर, माजी जि. प. सदस्य वैशाली कुकडे, पं. स. सदस्य गणपतराव कोठारे, माजी जि. प. सदस्य भालचंद्र बोदलकर, निलकंठ नैताम, संतोष नैताम, संजय सातपुते, नागोराव कोठारे, पांडुरंग शेटे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. फंड पुढे म्हणाले, समाजाला संघटीत करण्यासाठी सर्वात मोठे माध्यम प्रबोधन आहे. त्यामुळे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक तेली समाज संघटनेतर्फे सूर्यकांत खनके, मीनाक्षी गुजरकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महोत्सवानिमित्ताने गावात संत शिरोमनी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखीची रामधून शोभायात्रा काढण्यात आली. समाज मंदिराचे भूमिपूजन व ध्वजारोहण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी संताजीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार सावली तालुका तेली समाज संघटनेचे अध्यक्ष तु. बा. कुनघाडकर यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.