पराक्रमी आदिवासींची गाथा नव्याने लिहिण्याची गरज
By admin | Published: January 12, 2015 10:46 PM2015-01-12T22:46:56+5:302015-01-12T22:46:56+5:30
जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून
सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मूल येथे पार पडले एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
मूल : जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून आदिवासी जमातीची गाथा नव्याने संशोधन करुन लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले.
स्थानिक कर्मवीर महाविद्यालयात ‘मराठी साहित्यात आदिवासी साहित्याचे योगदान’ या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण आणि साहित्यातूनच समाजाला नवीन दिशा मिळत असते असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. डॉ. राजन जयस्वाल, चर्चासत्राध्यक्ष मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी गावित, मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सचिव अॅड. अनिल वैरागडे यांनीही आदिवासी साहित्यावर प्रकाश टाकला. तर चर्चासत्राचे आयोजन करण्यामागचा हेतू प्रास्ताविकामधून प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांनी सांगितला. संचालन प्रा. धनराज खानोरकर यांनी केले.
दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी साहित्याच्या प्रेरणा, स्वरून आणि आव्हाने यावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. माधव सरकुंडे, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सौरभ सुमन, प्रभू राजगडकर उपस्थित होते. तिसऱ्या सत्रातील आदिवासी साहित्यातील ललित वाङमय या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, सुप्रसिद्ध कवयित्री कुसूम अलाम यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. संचालन प्रा. मोक्षदा मनोहर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राममनोहन बोकारे, सचिव अॅड. अनिल वैरागडे होते. समारोपीय वृत्तांतामधून प्रा. डॉ. माहेश्वरी गावित यांनी उपस्थित प्रतिनिधींना उद्बोधित केले. संचालन प्रा. रमेश पारेलवार यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी मानले. चर्चासत्राचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा. कऱ्हाडे, कापगते, प्रा. बनकर, प्रा. हांडेकर, प्रा. ताजणे, प्रा.मासीरकर, प्रा. राजूरकर, प्रा. डोंगरवार, प्रा. मोरे, प्रा. चुदरी, प्रा. बुरांडे, प्रा. पडोळे, प्रा. गायकवाड, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)