दूध व्यवसायात युवकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:36 PM2017-11-12T23:36:43+5:302017-11-12T23:37:02+5:30

मूल येथे निर्माण करण्यात आलेले मदर डेअरीचे दुधसंकलन व शितकरणात तालुक्यातून एक हजार लिटर दूध येत असून हे दूध दिवसेंदिवस वाढतच आहे.

The need for youth to take initiative in milk business | दूध व्यवसायात युवकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज

दूध व्यवसायात युवकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज

Next
ठळक मुद्देमहादेव जानकर : दूध संकलन व शितकेंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल येथे निर्माण करण्यात आलेले मदर डेअरीचे दुधसंकलन व शितकरणात तालुक्यातून एक हजार लिटर दूध येत असून हे दूध दिवसेंदिवस वाढतच आहे. यावरुन दुग्ध व्यवसायाला वाव असल्याने युवकांनी यात स्वत: पुढाकार घ्यावा. प्रामाणिकपणे काम केल्यास जीवनमान उंचाविण्यास दुग्धव्यवसाय मोलाचे ठरेल, असे मत राज्याचे दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन व मत्ससंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
ना. जानकर यांनी मूल-आकापूर स्थित उभारलेल्या मदर डेअरीच्या दुध संकलन व शितकेंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध अधिकारी देशपांडे, विभागाचे उपायुक्त चव्हाण, डॉ.संदीप छोकर, निलेश खलाटे, केंद्राचे संचालक अविनाश जगताप, प्रशांत जगताप, मदर डेअरीचे निरीक्षक आशिष पेटकर, केंद्र सहायक अमोल चुदरी, नरेश गंथडे, अनुप नेरलवार, लोकनाथ नर्मलवार, रुमदेव गोहणे आदी उपस्थित होते.
यावेळी रोजचे एक हजार लिटर दूध संकलन होत असल्याने शितकर साठवणुकीची क्षमता वाढवून दोन हजार लिटर करण्याची मागणी करण्यात आली. ना. जानकर यांनी ही क्षमता वाढविण्यास संमती दर्शविली. योग्य भाव व थेट बँकेत रक्कम जमा होत असल्याने चिल्लर दूध विकण्यापेक्षा येथे दूध विकण्यासाठी पसंती दर्शविली जात आहे.

Web Title: The need for youth to take initiative in milk business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.