गरजुंनी आयुष्यमान भारत योजनेचा घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:47 PM2018-11-02T22:47:25+5:302018-11-02T22:47:43+5:30
गरजु नागरिकांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे गुरूवारी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गरजु नागरिकांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसोबतच आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कोरपना तालुक्यातील नांदगाव येथे गुरूवारी प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रमात ते बोलत होते.
गोवरी, पोवनी साखरी (वा.), वरोडा, पेल्लोरा, मारडा, नांदगाव, कवठाळा, कोलगाव, निंबाळा, गाडेगाव, बोरगाव येथील ६३ महिला लाभार्थ्यांना इंडेन गॅस वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, दिशा समिती सदस्य खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, पं.स. सदस्य नुतन जीवने, विजय सातदिवे, अरविंद कुमार, वंदना बेरड, नरेश सातपुते, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. अहीर यांनी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती दिली. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) व शासनाच्या उत्तम धोरणामुळे शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. अंबूजा सिमेंट प्रकल्पातील नांदगाव, कवठाळा परिसरातील अधिग्रहित जमिनीला हक्काचा भाव मिळवून देण्याचे ना. अहीर यांनी जाहीर केले. यावेळी कृष्णा गेडाम, अॅड. प्रशांत घरोटे, वैभव जमदाडे, संजय चैधरी, सुदर्शन बोबडे, संदीप कावळे, संजय कोहपरे, दिलीप येलमुले, लक्ष्मण थेरे, संतोष भोयर, गणेश खोकले आदी उपस्थित होते.