Corona Virus in Chandrapur; मरकजवरून आलेल्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह; मात्र दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:13 PM2020-04-11T20:13:38+5:302020-04-11T20:14:35+5:30
जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्हा वांकडी मंडळामधील जैनूर येथील रहिवासी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यामुळे वांकडीवरून त्यांना हैद्राबादला कुटूंबासह रेफर करण्यात आले आहे. जैनूर हे गाव महाराष्ट्र सीमेला अगदी लागून असल्यामुळे तेथील जनता भयभित झाली आहे.
जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले. सोबत त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नेण्यात आले आहे.
जैनुर हे गांव महाराष्ट्र राज्याच्या जिवती तालुक्याच्या सीमेस लागून आहे. येथील नागरिक बाजारपेठ व नाते संबंध असल्यामुळे नियमित जैनूरला जात-येत असतात. बाधीत व्यक्तीच्या वहिलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह असताना मुलांना कसा काय कोरोनाचा संसर्ग झाला, हेच आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे वडिलाच्या अहवालावर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून मोकळे फिरत होते. सध्या जैनुर परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे याची दखल महाराष्टÑ शासनास घेणे गरजेचे असून संर्पकांचा शोध-घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लक्कडकोट व जिवती सीमा सील करणे गरजेचे झाले आहे.