निष्काळजी खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:22+5:302021-09-18T04:30:22+5:30

ब्रम्हपुरी, शासकीय विश्रामगृह येथे ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही न. प. क्षेत्रातील पट्टे देण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

Negligence will not be tolerated | निष्काळजी खपवून घेणार नाही

निष्काळजी खपवून घेणार नाही

Next

ब्रम्हपुरी, शासकीय विश्रामगृह येथे ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही न. प. क्षेत्रातील पट्टे देण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, ब्रम्हपुरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि. प. सदस्य स्मिता पारधी, ब्रम्हपुरीचे तहसीलदार विजय पवार, सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, न. प. मुख्याधिकारी मंगेश वासेकर आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालय, भूमी अभिलेख व नगरपालिका यांनी समन्वयाने काम करावे. तसेच भूमी अभिलेख विभागाने एक महिन्यात मोजणी करावी. ग्रामीण भागातील घरकुलांनासुद्धा गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित मंजुरी द्यावी. गरिबांचे घरकुल पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिल्या.

बॅाख्स

ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना :

इतर मागास प्रवर्गातील ५०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील ज्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाचा लाभ मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष ४३ हजार रुपये याप्रमाणे विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करावे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमानुसार जिल्ह्यातील गुणवत्ता निकषावर विद्यार्थ्यांची निवड करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर उपस्थित होते.

Web Title: Negligence will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.