ना आधारकार्ड, ना रेशनकार्ड; जिवंत असल्याचा पुरावा काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:56 AM2024-09-04T11:56:24+5:302024-09-04T11:57:08+5:30
Chandrapur : भटक्या-जमातीतील कुटुंबाची अशीही व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही या देशातल्या व चंद्रपूर जिल्ह्यातील भटके-विमुक्तांकडे अद्यापही रेशनकार्ड, आधारकार्ड व मतदारकार्डही नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा या भटक्या कुटुंबाकडे जिवंत असल्याचा पुरावा काय, असा प्रश्न पडत आहे.
चंद्रपूर शहरातील नागपूर रोड, दाताळा रोड यासोबतच गडचिरोली रोड, बल्लारपूर रोड येथे अनेक भटक्या समाजातील अनेक भटके कुटुंब वास्तव्यास आहेत. व्यवसायासाठी ते गावोगावी भटकत असतात. गॅस शेकडी, कुकर दुरुस्ती, गोणे व फन्ऱ्या शिवणे, किंगरी व दमसाहेब वाजवून ते कुटुंबाचे पालनपोषण करतात. या पालातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यांच्यातील बहुतांश जणांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नसल्याने यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच मतदारकार्ड नाही
तात्पुरती वस्ती करून राहणाऱ्या अनेकांकडे मतदान कार्ड नाही. एवढेच नाही तर अनेकजण शिक्षणापासून दूर आहेत. ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनच दूरच आहेत.
रेशनकार्ड नाही
कुठलेही कागदपत्रे नसल्यामुळे या भटक्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, त्यामुळे त्यांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नाही.
आधारकार्ड नाही
पालात राहणाऱ्या बहुतांश लोकांकडे आधारकार्ड नाही. त्यांना स्वतःची ओळख पटवून देताना अडचणी निर्माण होत आहेत.
एकही प्रमाणपत्र नाही
अशा कुटुंबाकडे आधारकार्ड, मतदारकार्ड, रेशनकार्ड नाही. हातावर आणून पानावर खाणे ही त्यांची परिस्थिती आहे.
कुठल्याचा शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्र जोडावे लागतात. परंतु, या लोकांकडे कुठलेही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.
कागदपत्रे देण्यात अडचण काय?
कामधंदा करायचा आणि पोटाची खळगी भरायची यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असते. कागदपत्र गोळा करण्यासाठी पुरावे लागतात.