नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:10+5:302021-09-10T04:34:10+5:30
या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून पाण्यात जंत पडल्याचे दिसत आहे. अनेक ...
या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून पाण्यात जंत पडल्याचे दिसत आहे. अनेक दिवसांपासून पाण्याची टाकीची स्वच्छता केली नाही. आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता दिसून येत असून जिकडे तिकडे कचरा, घाण दिसत आहे. उपचारासाठी जाताना पावती काढणारा कर्मचारी टेबलवर हजर राहत नाही. रात्री फक्त दोन कर्मचारी हजर राहतात. वैद्यकीय अधिकारी हजर राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. औषधीचा साठा सुद्धा उपलब्ध राहत नाही. रुग्णवाहिका उपलब्ध राहत नाही. अशा अनेक समस्यांनी या आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभार सुरू आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधींचे सुद्धा लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील मोठे केंद्र असून या आरोग्य केंद्राला सहा उपकेंद्र जोडले असून अंदाजे तीस ते चाळीस खेडी गावे जोडली असून याच आरोग्य केंद्राच्या भरोशावर कामकाज सुरू आहे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खासगी किंवा इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहे आकस्मिक सेवा नसल्यामुळे रुग्णांना आपले जीव गमवण्याचा धोका निर्माण झाला आहे गोरगरीब सामान्य रुग्णाच्या सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे मात्र येथे अनेक समस्या असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे आपले उपचार करण्याकरिता बाहेर जावे लागत आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड त्यांच्यावर बसत आहे रुग्णांना या केंद्रात पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कडे दुर्लक्ष होत आहे आरोग्य केंद्र हे रुग्णाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी बनविले आहे परंतु इथे स्वच्छता दिसत नाही त्यामुळे बरेच रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात जाताना दिसत आहेत उपचारासाठी येणारे रुग्ण हे सर्व बघून उपचार न करताच बाहेर जात आहेत सध्या पावसाळा असून साथीच्या रोगांची लक्षणे दिसून येत आहेत व रुग्ण पण आहेत परंतु या केंद्रात सोयी सुविधा च्या अभावामुळे रुग्णांनी याकडे पाठ फिरवली आहे आणि या सर्व बाबीकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधींचे सुद्धा लक्ष नाही तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या आरोग्य केंद्राला समस्याच्या विळख्यातून बाहेर काढावे तसेच योग्य ती चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जनता करीत आहे
090921\img-20210908-wa0167.jpg
हेच ते प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात आहे