आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये नेटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:34+5:302021-09-08T04:33:34+5:30
ही संपूर्ण स्पर्धा मुले आणि मुली अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात आली होती. त्यामध्ये विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुलांच्या १० आणि ...
ही संपूर्ण स्पर्धा मुले आणि मुली अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात आली होती. त्यामध्ये विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुलांच्या १० आणि मुलींच्या आठ अशा एकूण १८ संघांनी आपला सहभाग नोंदविला.
मुलांमध्ये चंद्रपूर संघाने प्रथम क्रमांक (तीन हजार रुपये रोख व चषक) पटकावला. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक (एक हजार ५०० रुपये रोख व चषक) पटकावला. भंडारा व ज्ञानदा विद्यालय, सातेफळ या संघांमध्ये चुरशीची लढत होऊन बरोबरी साधली. या दोन्ही संघाला तृतीय क्रमांक (एक हजार रुपये रोख व चषक) देण्यात आला. मुलींमध्ये भंडारा जिल्ह्याच्या संघाने प्रथम क्रमांक (तीन हजार रुपये रोख व चषक) पटकावला. चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाने द्वितीय (एक हजार ५०० रुपये रोख व चषक) तर तृतीय क्रमांक आनंद निकेतन महाविद्यालयाच्या संघाने (एक हजार रुपये रोख व चषक) पटकावला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना सुद्धा आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेले पंच विनोद सलाम, अमोल ठाकरे, सुरेश तरारे यांचाही सन्मान करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मृणाल काळे, प्रमुख पाहुणे प्रा. मानसी काळे, निखिल पोटदुखे, विलास नेरकर, बंडू डाखरे, चंद्रकांत कुंभारे, मयूर सोमलकर, लकी खिलोशिया, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रा. तानाजी बायस्कर, तुषार पारखी, खेळाडू चिराग भोयर, दर्शना कुत्तरमारे, सायली उपरे यांनी सहकार्य केले.
070921\img_20210907_101715.jpg
warora