नागभीड तालुक्यासाठी नवे मोबाईल अॅप
By admin | Published: July 16, 2016 01:20 AM2016-07-16T01:20:23+5:302016-07-16T01:20:23+5:30
नागभीडकरांना मार्गदर्शक ठरेल, अशा ‘मोबाईल अॅप’चे नागभीडचे तहसीलदार समीर माने यांनी शुक्रवारी विमोचन केले.
समीर माने : माहिती नागभीडकरांना दिशादर्शक
नागभीड : नागभीडकरांना मार्गदर्शक ठरेल, अशा ‘मोबाईल अॅप’चे नागभीडचे तहसीलदार समीर माने यांनी शुक्रवारी विमोचन केले. यावेळी अॅपचे निर्माते चेतन शंकर उईके, कुंजन सुरेश मस्के, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुरेश मस्के उपस्थित होते.
या अॅपमध्ये नागभीड नकाशा, नागभीड येथील सर्व शासकीय कार्यालयांची माहिती, आरोग्य विषयक सेवा व दवाखान्यांची माहिती, दूरध्वनी व मोबाईल क्रमांक, नागभीड तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती, एस.टी बस व रेल्वेचे वेळापत्रक, शैक्षणिक संस्थाची माहिती, बँकेची माहिती, नागभीड येथील पत्रकार व त्यांचे मोबाईल क्रमांक, रुग्णवाहिका व त्यांचे क्रमांक, पोलीस स्टेशन आदी विविध माहिती अपलोड करण्यात आली आहे.
या अॅपच्या विमोचनप्रसंगी बोलताना तहसीलदार समीर माने म्हणाले, खरे तर अशा प्रकारच्या अॅपची निर्मिती करण्याची तहसील प्रशासनाचीच योजना होती. पण त्या अगोदरच नागभीडच्या युवकांनी अॅप तयार केले. खरेच या युवकांच्या कल्पकतेला दाद द्यायला पाहिजे. या अॅपमध्ये आणखी काही माहिती टाकायची असेल तर त्याला माझे संपुर्ण सहकार्य राहील, अशी हमी दिली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)