कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबिनची आवक
By Admin | Published: October 14, 2016 01:32 AM2016-10-14T01:32:37+5:302016-10-14T01:32:37+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या मुख्य बाजार स्थळ रामनगर मार्केट यार्ड येथे नवीन सोयाबिन
रामनगर मुख्य बाजार स्थळ : शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या मुख्य बाजार स्थळ रामनगर मार्केट यार्ड येथे नवीन सोयाबिन शेतमालाची आवक १३ आॅक्टोबर गुरुवारपासून सुरू झाली आहे. सर्वप्रथम लखमापूर येथील पुरुषोत्तम पिंपळशेेंडे या शेतकऱ्याने १० पोते सोयाबिन विक्री करीता येथे आणला. त्यांचा शाल व श्रीफळ, हार देवून सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी सत्कार केला.
अविनाश उलमाले यांनी १५ पोते सोयाबिन विक्री करिता आणले. त्यांचाही यावेळी शाल व श्रीफळ, हार देवून उपसभापती रणजीत डवरे यांनी सत्कार केला. तसेच बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय पावडे यांनीही दोन्ही शेतकऱ्यांचा सत्कार केला.
पहिल्या दिवशी सोयाबिनची आवक २५ पोत्याची झाली असून २४७१ ते २६५१ रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले. अडते शरद ठाकरे, सुरेश मत्ते, रविंद्र रागीट, संतोष भोयर यांचे अडतमध्ये शेतमाल आला असून खरेदी करणारे व्यापारी शांती ट्रेडर्स, भक्ती ट्रेडर्स व सारडा ट्रे. कंपनी हे यावेळी उपस्थित होते. तसेच यार्डवरील अडते व व्यापारी, सदस्य योगेश बोबडे, प्रभाकर सिडाम उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)