नवीन मतदार याद्या होणार अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:36+5:302021-08-25T04:33:36+5:30
१ नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधित मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार याद्या प्रारूपरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ ...
१ नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधित मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार याद्या प्रारूपरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु मतदार यादीत ज्यांचे नाव नाहीत, अशा पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा संबंधित तहसील कार्यालयात नमुना ६ मधील अर्ज पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रासह भरून देता येईल. त्याबरोबर ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाही, अशा मतदारांकडून रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो प्राप्त करून मतदार यादीत अपलोड करण्यात येणार आहे.
ही मोहीम ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येत असून, या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा, तसेच प्रारूप छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मृत, स्थानांतरीत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
मतदारांनी छायाचित्र मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदारांना सहकार्य करावे व या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.