नवमतदारांनी लोकशाही बळकट करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:24 PM2018-01-27T23:24:48+5:302018-01-27T23:25:20+5:30

आपले मत हे मौल्यवान असल्याने सर्वांनी मतदानात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवमतदारांनी अधिक सक्रीय सहभाग घेवून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले.

The new voters should strengthen the democracy | नवमतदारांनी लोकशाही बळकट करावी

नवमतदारांनी लोकशाही बळकट करावी

Next
ठळक मुद्देमनोहर गव्हाड : राष्ट्रीय मतदारदिनी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आपले मत हे मौल्यवान असल्याने सर्वांनी मतदानात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवमतदारांनी अधिक सक्रीय सहभाग घेवून देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले.
जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे बचत साफल्य भवन येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार संतोष खांडरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटमल गहलोत आदी मंचावर उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सीमा अहिरे यांनी प्रास्ताविकात म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनाकांवर आधारीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम एकूण २०५५ मतदान केंद्रावर राबविण्यात आला. जिल्ह्यात नव्याने एकूण २२ हजार १७७ मतदारांची नोंदणी केली. जिल्ह्यात पुरुष मतदार ९ लाख ३७ हजार ५३, स्त्री मतदार ८ लाख ८० हजार ८४१ व इतर मतदार (तृतीयपंथी) ११ असे एकूण १८ लाख १७ हजार ९०५ मतदार आहे. २०१७ च्या संभाव्य लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण ६९.३३ इतके असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार खांडरे व रोटरी क्लब अध्यक्ष रोटमल गहलोत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधिक स्वरुपात नवमतदार संदीप मेश्राव, तरुण आहुजा व साक्षी धावंजेकर यांना नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले. मतदानाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवडणूक ज्ञान स्पर्धेत प्रथम पालेबारसा येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव धुळसे, द्वितीय चंद्रपूर येथील भवानजीभाई चव्हाण हायस्कूलची शिरीन असलमखान पठाण हिला देण्यात आला. निबंध स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक भवानजीभाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशांत मुंगरे, अंश उराडे, दक्षिता कस्तुरे यांना दिला. तसेच चित्रकला स्पर्धेत भवानजीभाई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला त्यामध्ये जय कुंभारे, प्रथमेश बुम्मेवार, प्राजली कांमडे यांचा समावेश आहे. मुलांच्या दौड स्पर्धेत प्रथम महेश वाढई आंबेडकर महाविद्यालय, व्दितीय शिवाजी गोस्वामी जनता महाविद्यालय, तृतीय विजय भगत जनता महाविद्यालय यांना देण्यात आला. तर मुलींच्या दौड स्पर्धेत प्रथम जैनब खान लोकमान्य टिळक विद्यालय, व्दितीय समृध्दी आदे लोकमान्य कन्या विद्यालय, तृतीय पूजा माने लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर यांनी पटकाविला.

Web Title: The new voters should strengthen the democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.