दुसऱ्या दिवशीही दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:59 PM2018-12-03T22:59:01+5:302018-12-03T22:59:19+5:30
पोलिसांनी दारुबंदीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून रविवारी व सोमवारी लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यामुळे अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भद्रावती पोलिसांनी पेट्रोल पंप चौकात कारवाई करीत तीन लाख १६ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून तीन जणांना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : पोलिसांनी दारुबंदीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून रविवारी व सोमवारी लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यामुळे अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भद्रावती पोलिसांनी पेट्रोल पंप चौकात कारवाई करीत तीन लाख १६ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला असून तीन जणांना अटक केली आहे.
विठोबा केशव बाकडे (५१), गणेश हरिभाऊ धार्मिक (४३), दिगांबर निलकंठ धार्मिक (२९) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारुविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र अवैध दारुविक्रेते चोरट्या मार्गाने दारुची विक्री करीत आहे. रविवारी नागपूर चंद्रपूरमार्गे चारचाकी वाहनातून दारुसाठा वाहतूक होत असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर भद्रावती पोलिसांनी पेट्रोल पंप चौकात नाकाबंदी केली. यावेळी एम एच ४३ आर ६१४३ या क्रमांकाचे वाहन येताना पोलिसांना दिले. मात्र वाहनचालकांना याची कुणकुण लागताच त्याने पोलिसांना चकमा देत तेथून पळ काढला. दरम्यान पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करुन त्याला उर्जानगर परिसरात गाठले.
यावेळी वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये दारु आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सर्व दारुसाठा जप्त व वाहन असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तीन जणांना अटक करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, शाहसबाज, दिनेश सूर्यवंशी, हेमराज प्रधान यांच्यासह भद्रावती पोलिसांच्या चमूने केली.