दुसऱ्या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:55+5:30
बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शुक्रवारी दुसºया दिवशीही सुरू होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रूजू झाला नाही. त्यामुळे दुसºया दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले नाही. यामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आजही निर्मनुष्य दिसत होता. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाºया सास्ती, गोवरी, पोवणी, बल्लारपूर, गोवरी डीप, साखरी या ओपनकास्ट आणि बल्लारपूर ३ व ४ पिट व सास्ती या दोन भूमिगत अशा सर्व आठ खाणीतील कोळसा व माती उत्खनन पूर्णपणे बंद होते. येथील दोन खाणीत खासगी कंत्राटदारामार्फत सुरू असलेले माती उत्खननही बंद होते. कोळशाची रेल्वे व खासगी ट्रकद्वारे होणारी पूर्ण वाहतूक ठप्प होती. आजही कामगार घरूनच निघाले नसल्याने केवळ अधिकारी तेवढे कामावर होते. काम बंद झाल्याने वेकोलिचे प्रचंड नुकसान झाले. केंद्र सरकारच्या कोळसा उद्योगात कमर्शियल मायनिंगच्या निर्णयावर सरकारने विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे सर्वच कामगारांचे म्हणणे आहे. पाचही कामगार संघटनांनी हा विषय कामगारापर्यंत अत्यंत प्रखरपणे पोहोचविल्याने व त्याचा यथायोग्य प्रचार झाल्याने कामगार स्वयंस्फुर्तपणे या संपात सहभागी झाले, हे विशेष. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी सर्व संघटनांना पत्र लिहून कामगारांच्या या अस्तित्वाच्या लढाईला आपला पाठिंबा घोषित केला आहे.
कमर्शियल मायनिंगच्या माध्यमातून रोजगार मिळेल. सरकारला महसुलाद्वारे फायदा मिळेल. हा दावा पूर्णत: खोटा व दिशाभूल करणारा आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने ५२ कॅपटीव्ह माईन्स खासगी उद्योगांना देऊन हा प्रयोग केला आहे. पण त्यातील केवळ चार माईन्स सुरू झाल्या. त्यातून लोकांना रोजगार तर मिळाला नाहीच उलट तेथील कामगारांचे शोषण झाले. या कमर्शियल कोळसा खाणीमुळे काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होऊन कामगार व जनतेचे शोषण होणार आहे. या कमर्शियल मायनिंगमुळे देशाचा विकास होणार नाही.
-नंदकिशोर म्हस्के, केंद्रीय अध्यक्ष,
संयुक्त खदान मजदूर संघ(आयटक), नागपूर.
अत्यावश्यक सेवाही बंदच
शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा विद्युत, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा यामध्ये काम करणारे कर्मचारी कामावर आले नाहीत. प्रथम, द्वितीय व तृतीय रात्र पाळीतही कामगार संघटनांचे नेते पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. कुठल्याही स्थितीत संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा इंटक, आयटक, बीएमएस, एचएमएस व सिटू या पाचही कामगार संघटनांचा निर्धार आहे.