कोरोना संघर्षात पुढील दहा दिवस महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:29+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील ४५ कुटुंबांना १५ दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे.

The next ten days are important in the Corona conflict | कोरोना संघर्षात पुढील दहा दिवस महत्त्वाचे

कोरोना संघर्षात पुढील दहा दिवस महत्त्वाचे

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : सोशल डिस्टन्सिंग पाळा; जिल्ह्याच्या सिमा कडेकोट बंद ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. शहर, गाव, तालुका यांच्या प्रत्येकाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. यातील सर्व यंत्रणेने अशा परिस्थितीत अतिशय गांभीर्याने आपापली जबाबदारी पार पाडावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठयासाठी शासन प्रयत्नरत आहे. तरीही बाहेर पडला तर आपसात सामाजिक अंतर पाळावे. पुढील दहा दिवस आणखी थोडी झळ सोसावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. तर वरोरा परिसरात उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्यामार्फत परराज्यातील ४५ कुटुंबांना १५ दिवसांचे अन्नधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारागृहात पाच हजारावर विविध राज्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिक मुक्कामी असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहे. महानगरपालिकामार्फत निराश्रित, निराधार, बेघर व विमनस्क व्यक्तींना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तयार भोजनाचे वितरण होत आहे. यासोबतच महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांगांना त्यांच्या पैशाने घरपोच किराणा व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी एका टिमचे गठण केले आहे. त्यांच्यामार्फत घरपोच ही सेवा देण्यात येत आहे.

महावीर जयंतीला घरातूनच प्रार्थना करा - वडेट्टीवार
भगवान महावीर यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली आहे. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. त्या शिकवणीनुसार सर्वांनी आचरण ठेवल्यास संपूर्ण मानवजात सुखी होईल, असे मत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. महावीर जयंतीनिमिताने दरवर्षी अनेक जैन बांधव भजन संध्येसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. मात्र यंदा सर्व सणांवर कोरोना नामक संकटाचे सावट असल्याने मोठा उत्सव साजरे करणे तरी शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा महावीर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. कोरोना या विषाणू प्रादुर्भावाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि घराबाहेर पडणे टाळावे, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातूनच करावी, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जैन बांधवांना केले आहे.

बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची नोंद
ग्रामीण भागात आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन येणाºया नागरिकांची माहिती घेत आहे. गेल्या १७ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत ज्यांनी बाहेरगावी प्रवास केला, अशा सर्वांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणीदेखील केली जात आहे. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याधिकारी कार्यालयामध्ये गठीत करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांमधूनदेखील दहा वेगळ्या फोन लाईन्समार्फत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना दूरध्वनी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी अशा संदर्भातील तपासणीसाठी येणाºया दूरध्वनीला व कर्मचाऱ्यांना योग्य प्रतिसाद द्यावा. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही चौकशी होत असून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

२०१ जण क्वारंटाईन पूर्ण होऊन मुक्त
दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदेशात प्रवास करून आलेल्या फक्त तीन व्यक्तींना निगराणीत सध्या ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ दिवस होम क्वारंटाईनचा अवधी २०१ नागरिकांनी पूर्ण केला आहे. २०१४ नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे.

धान्याचे मोफत वाटप
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना एक महिन्याचे रेशन वाटप सुरू झाले आहे. आपल्या रेशन कार्डवर दोन व तीन रुपये दराने अन्य अन्नधान्य मिळत असताना प्रत्येक अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत वाटपदेखील सुरू झाले आहे.

काही दिवस शिस्त पाळावी
दरम्यान, पुढील दहा दिवस सुरू राहणाºया लाकडाऊन कालावधीत नागरिकांनी आतापर्यंत पाळलेली शिस्त कायम ठेवावी. चंद्रपूर शहरांमध्ये सामाजिक अंतर पाळून नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रतिबंध करावा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असली तरी घरातील एकाच नागरिकाने आठवडयाभरातून एकदाच बाहेर पडून, हे साहित्य घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. रस्त्यावरील दुचाकी वाहनांची संख्या कमी करण्यासाठीदेखील त्यांनी निर्देशित केले असून पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

Web Title: The next ten days are important in the Corona conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.