पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्था सरसावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:34+5:302021-09-04T04:33:34+5:30
चंद्रपुरात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. त्यासाठी मनपानेदेखील पूर्वतयारी सुरू केली आहे. मूर्ती आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. ...
चंद्रपुरात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. त्यासाठी मनपानेदेखील पूर्वतयारी सुरू केली आहे. मूर्ती आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकडून मार्गदर्शक सूचना आणि पर्यावरणपूरक नवीन उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्लाॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विक्री, आयात आणि निर्मिती होताना आढळल्यास त्यावर आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. याशिवाय रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, सायकल चालविणे, सौरऊर्जेचा वापर, कंपोस्ट खत निर्मिती, माझे घर माझी बाग आदी उपक्रमांना चालना देण्यास, तसेच यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावर प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केले. बैठकीला स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे नितिन रामटेके, राजू काहीलकर, अमोल उट्टलवार, अजय बहुद्देशीय संस्थेच्या स्वाती धोटकर, महेश शेंडे, कुंभार समाज विकास संस्थेचे अजय मार्कडेयवार, राजेश रामगुंडेवार, चंद्रपूर जिल्हा कुंभार समाज बहुद्देशीय संस्थेचे सुभाष तटकंटीवार आणि रक्षण धरणीमातेचे, जगूया माणुसकीने संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.