नायजेरियन तरूणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Published: June 5, 2014 11:55 PM2014-06-05T23:55:33+5:302014-06-05T23:55:33+5:30

येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक

Nigerian youth gets five-day police custody | नायजेरियन तरूणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

नायजेरियन तरूणाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Next

फसवणूक: अनेक नावे समोर येण्याची शक्यता
ंचंद्रपूर: येथील उद्योजक नितीन पोहणे यांची आर्थिक फसवणूक करणार्‍या पॅट्रीक नोबल या तरूणाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. पॅट्रीक नोबल हा फसवणूक करणार्‍या आंतराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे. या टोळीत काही महिलांचाही समावेश असल्याची शंका आहे.
पोलिसांनी आरोपीजवळून त्याचा पासपोर्ट व व्हिसा जप्त केला असून ते बनावट तर नाही ना, याचा तपास पोलीस करीत आहेत. या टोळीने देशभरात अनेकांची अशी फसवणूक केली असावी, अशी शंका पोलिसांना आहे.
नितीन पोहाणे यांचा वॉटर ट्रिटमेंट प्लांट बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना मुंबई येथून पॅट्रीक नोबल याने दूरध्वनीवरून संपर्क साधला. आपण अफ्रीकेचे रहिवासी आहोत, असे त्याने पोहणे यांना सांगितले. त्याने वॉटर ट्रिटमेन्ट प्लॅंटबद्दल विचारण केली. त्याच दिवशी डॉ.कोलिन यांचा ई-मेल पोहाणे यांना आला. त्यांनीही त्याच विषयावर पोहाणे यांच्याशी चर्चा केली. मी नोबेल नावाच्या व्यक्तिला तुमच्याकडे पाठवित आहे, असा संदेश त्यांनी इंटरनेटवरून दिला. त्यानंतर काही दिवसांनी स्वत: डॉ.कोलिन यांने पोहाणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. नोबलचा तुमची फॅक्ट्री दाखवा. पसंत आली तर दोन मीलियन डॉलर तुमच्याकडे पाठवितो. असे पोहाणे यांना सांगितले. मात्र ३0 टक्के रक्कम तुम्ही माझ्या खात्यात जमा करा, असे पोहाणे यांनी डॉ.कोलिन याने सांगितले. आपण राजकारणी असल्याने पैसे खात्यात जमा करता येणार नाही, अशी थापही त्याने मारली. त्यानंतर पॅट्रीक नोबल चंद्रपुरात पोहचला. त्याने पोहाणे यांच्याकडून १0 हजार रुपये घेतले. प्लांटची पाहणी करून तो निघून गेला. त्यानंतर घडलेल्या एकूणच घडमोडी संशयास्पद वाटल्याने पोहाणे यांनी प्रसंगावधान राखले. आपली फसगत होत असल्याची बाब लक्षात येताच, त्यांनी नागपूर येथे जाऊन नोबलला पकडून चंद्रपुरात आणले व पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि ४२0, ४२३, ४७१, ५0६ आणि सायबर कायदा ६६ (अ), ६६ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  (प्रतिनिधी) 

Web Title: Nigerian youth gets five-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.