निकिता शर्मा, निखिल सरकार, स्नेहा धकाते विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:25 PM2018-06-05T22:25:47+5:302018-06-05T22:26:12+5:30
लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच व राजदीपच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात भव्य लोकमत मि.,मिस. अॅन्ड मिसेस ग्लॅम आयकान २०१८ चा ग्रँड फिनाले थाटात पार पडला. विदर्भातील मॉडेल्सची रॅम्पवर धूम, डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य, बक्षिसांची लयलुट आणि प्रेक्षकांची टाळ्यांची दाद यामुळे सोहळ रंगला.
चंद्रपूर : लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच व राजदीपच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात भव्य लोकमत मि.,मिस. अॅन्ड मिसेस ग्लॅम आयकान २०१८ चा ग्रँड फिनाले थाटात पार पडला. विदर्भातील मॉडेल्सची रॅम्पवर धूम, डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य, बक्षिसांची लयलुट आणि प्रेक्षकांची टाळ्यांची दाद यामुळे सोहळ रंगला.
लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, सिनेतारिका प्राजक्ता शिंदे, मिसेस युनिव्हर्स लव्हली शिल्पा अग्रवाल नागपूर, सुपर मॉडेल मोहसीन पटेल मुंबई, सानिका सोवानी नागपूर, दीपक पारख, पी.एस. आंबटकर, एन.एम. पुगलिया ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पुगलिया, सोमय्या मुव्हीजचे पियुष आंबटकर, अॅलेक्सीज हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर निरंजन जोशी, राजदीपचे संचालक प्रकाश टहलियानी व विक्रम टहलियानी, हॉटेल सिद्धार्थ प्रिमियरचे संचालक अवी सलुजा, एजुस्टेशनचे संचालक प्रशांत ठाकरे, मयूर वनकर, लाईफ स्टाईल गॅलरीच्या संचालिका अश्विनी तोमर, सोना मेकओव्हर नागपूरच्या संचालिका सोनम साखरे, ग्लॉसीक्स सलूनच्या संचालिका लता हडपे, नटराज डान्स इन्स्टिट्युटचे संचालक जावेद शेख, स्टुडिओ कलरबारचे संचालक गोलू बाराहाते, जितेंद्र चोरडिया, रमन बोथरा, लोकमत शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, परीक्षक मेहुल पटेल उपस्थित होते. त्रेशा उराडे बालिकेने लावणीतून प्रेक्षकांना भारावून सोडले. यानंतर मि., मिस., मिसेस या तिन्ही गटातील स्पर्धेला वेस्टर्न राऊंडने सुरूवात झाली. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता शिंदे यांची नागपूर लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी मुलाखत घेतली. नटराज डान्स इन्स्टिट्युटच्या चमूने नृत्य सादर केले. कोरीओग्राफी इलाईट मिसेस इंडिया आयकॉनिक अश्विनी तोमर, मि.चंद्रपूर निखिल अस्वानी, मिस.इंडिया ग्लोब सानिया खान, मिसेस राजस्थान नुतन कोलेवार, फिल्म असिस्टंट डायरेक्टर अनिकेत चांदेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांनी पारितोषिक वितरण केले. संचालन नेहा जोशी, जिल्हा उपक्रम प्रमुख अमोल कडूकर, आभार सखी मंच संयोजिका सोनम मडावी यांनी मानले. विना खोब्रागडे, ऐश्वर्या खोब्रागडे, शिल्पा कोंंडावार, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्यांनी परिश्रम घेतले.
मि.ग्लॅम आयकॉन
वृषभ जेनेकर - फर्स्ट रनरअप
वैभव दिवे - सेकंड रनरअप
विनीत राजगडकर- फोटोजनिक
प्रतिक बनकर - बेस्ट स्माईल
गणेश पायघन-बेस्ट पर्सनॅलिटी
जितू सोमनानी - पॉप्युलर
शुभम गोविंदवार - बेस्ट वॉक
सुजित वाणी - बेस्ट इंटेलिजंट
निहाल खान - बेस्ट कॉन्फीडंट
मिस.ग्लॅम आयकॉन
सानिया दत्तात्रय - फर्स्ट रनरअप
रचना तिवारी- सेकंड रनरअप
पल्लवी अलोणे - फोटोजनिक
मृणाली चहांदे - बेस्ट स्माईल
सुप्रिया चव्हाण - ग्लॅमरस
वसुधा गाऊत्रे - पॉप्युलर
मानसी पवार - बेस्ट आईज
चिऊ देवघडे - बेस्ट वॉक
विरश्री खोब्रागडे - बेस्ट इंटेलिजंट
सृष्टी धनमणे - बेस्ट कॉन्फीडंट
मिसेस.ग्लॅम आयकॉन
गायत्री वाडेकर - फर्स्ट रनरअप
प्रियंका कुंभारे -सेकंड रनरअप
ज्वाला मुन -फोटोजनिक
वैशाली कुरतोडवार -बेस्ट स्माईल
सरिता चौधरी - ग्लॅमरस
स्मिता चावडा - पॉप्युलर
श्रद्धा भट्ट- - बेस्ट आईज
वैशाली रोहनकर - बेस्ट वॉक
नेहा चांदेकर - बेस्ट इंटेलिजंट
पुनम पाटील - बेस्ट कॉन्फीडंट