ब्रह्मपुरीत नऊ लाखांची देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:14 AM2017-09-18T00:14:05+5:302017-09-18T00:14:17+5:30

हळदा येथे देशमुख यांच्या रिकाम्या घरी २३ प्लास्टिक पिशव्यात ९२ देशी दारूच्या पेट्या असा नऊ लाख २० हजाराचा देशी दारूचा साठा ब्रह्मपुरी पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई शुक्रवारच्या रात्री करण्यात आली.

Nine lakh of country liquor was seized in Brahmaputra | ब्रह्मपुरीत नऊ लाखांची देशी दारू जप्त

ब्रह्मपुरीत नऊ लाखांची देशी दारू जप्त

Next
ठळक मुद्देहळदा येथील कारवाई : एकाला अटक, दुसरा पसार; पोलीस मागावर

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : हळदा येथे देशमुख यांच्या रिकाम्या घरी २३ प्लास्टिक पिशव्यात ९२ देशी दारूच्या पेट्या असा नऊ लाख २० हजाराचा देशी दारूचा साठा ब्रह्मपुरी पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई शुक्रवारच्या रात्री करण्यात आली. या कारवाईत राजेदरसिंग जनरलसिंग बावरी (२४) रा. मुडझा. याला अटक करण्यात आली असून अजितसिंग गुरूमुखसिंग रा.मुडझा हा पसार आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपीने हळदा येथील देशमुख यांच्या रिकाम्या घरी देशी दारूचा अवैध साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. या धाडसत्रात २३ प्लॉस्टिक पिशव्यांमध्ये ९२ पेट्या देशी दारू व प्रत्येक पेटीत १०० नग दारूच्या शिलबंद बाटला असा एकूण ९ लाख २० हजार रूपये किमंतीचा माल हस्तगत करण्यात आला.
ग्रामीण भागातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेसी, प्रभारी ठाणेदार रघुनाथ कळके यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डीबी पथक प्रमुख पीएसआय खंडारे, पिसे, बालाजी पवार, सिध्दार्थ पेटकर, अनिल शेडमाके, दीपक दुधे, सुशाल कुमरे यांनी केली आहे. दोन्ही ओरोपींवर मुंबई दारूबंदी कायन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

भद्रावतीत अडीच लाखांचा दारूसाठा जप्त
भद्रावती : शहरात चालू असलेल्या अवैध दारूविक्री लक्षात घेता नव्याने रूजू झालेले ठाणेदारांनी वर्धा नगरी वरील ढोरवासा, पिपरी घाटावरून अडीच लाखंच्या दारूसाठासह २ आरोपींना ताब्यात घेतले. तर ३ आरोपी पसार झाले ही कारवाही शुक्रवारी केली. यातील रमेश येलमुले (१९) रा. शिवाजी नगर, शिवम अतकर (१९) रा. शिवाजी नगर या दोघांना अटक केली असून महेश गलंडे, नागेश रामटेके, प्रफु ल आसूटकर हे आरोपी पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असून या कारवाईने दारूतस्करांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Nine lakh of country liquor was seized in Brahmaputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.