नोकरीला खो देऊन निशांतने सुरू केली नर्सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:52+5:302021-06-01T04:21:52+5:30

सिंदेवाही : शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे लागून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रत्येक तरुणाचा प्रयत्न असतो. परंतु सिंदेवाही येथील निशांत ...

Nishant lost his job and started a nursery | नोकरीला खो देऊन निशांतने सुरू केली नर्सरी

नोकरीला खो देऊन निशांतने सुरू केली नर्सरी

Next

सिंदेवाही : शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे लागून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रत्येक तरुणाचा प्रयत्न असतो. परंतु सिंदेवाही येथील निशांत नीलकंठ भरडकर याने नोकरी सोडून स्वतःचे नर्सरी केंद्र सुरू करून एक नवीन आदर्श तरुण पिढीसमोर निर्माण केलेला आहे.

निशांत यांनी आपल्या शेतामध्ये तालुक्यातील एकमेव नर्सरी सुरू केलेली आहे. या नर्सरीच्या माध्यमातून भाजीपाला व शोभेच्या रोपांची लागवड त्यांनी सुरू केली आहे. वेगवेगळे प्रयोग करून अनेक प्रकारच्या रोपांची निर्मिती त्यांनी केली असून, सिंदेवाही नगरातील अनेक लोक या नर्सरी केंद्राला भेट देत आहे. दर्जेदार रोपे देण्यासोबतच शेतकरी लोकांना मार्गदर्शन करण्याचा काम निशांत करीत आहे. शेतामधूनसुद्धा रोजगार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो, असे निशांतचे मत आहे.

Web Title: Nishant lost his job and started a nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.