नितीन राऊत यांनी जाणून घेतले आंदोलनकर्त्यांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:27 PM2018-11-30T23:27:30+5:302018-11-30T23:27:48+5:30

जीएमआर पॉवर प्लांट वरोरा येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी कामगारांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनस्थळी गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली आणि कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.

Nitin Raut got to know the questions of the agitators | नितीन राऊत यांनी जाणून घेतले आंदोलनकर्त्यांचे प्रश्न

नितीन राऊत यांनी जाणून घेतले आंदोलनकर्त्यांचे प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देदुसरा दिवस : जीएमआर कंपनीच्या कामगारांचे अन्नत्याग आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जीएमआर पॉवर प्लांट वरोरा येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी कामगारांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनस्थळी गुरुवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली आणि कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
जीएमआर पॉवर प्लांट वरोरा येथे सदर कामगार पाच ते सात वर्षांपासून काम करीत आहेत. सदर कारखान्यात कामगारांच्या हिताच्या कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा पुरविल्या जात नाही. २२ नोव्हेंबर २०१६ ला कंपनीकडे कुशल व अकुशल कामगारांची ेपगारवाढ, वेतनाची पावती देण्यात यावी, संरक्षणासाठी रेनकोट देण्यात यावे, कामगारांचे पीएफ कापण्यात यावे, कामगारांच्या सुरक्षा दृष्टीकोणातून सुरक्षा पॉलिसी काढण्यात यावी. मेडिक्लेम पॉलिसी काढण्यात यावी. बस सेवा देण्यात यावी. कंपनी कायदा १९४८ अंतर्गत सेक्शन ११, १८, १९, ४०, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ७९, ८०, ८१, ८४ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, कामगारांना बोनस देण्यात यावे इत्यादी २३ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. जीएमआर पॉवर कंपनीने कामगारांना न्याय न देता कामगारांना कमी केले.
नंतर अनेकदा कामगारांना कंपनीत सामावून घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, कामगार मंत्री, सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून वैभव सुदाम वानखेडे, प्रमोद क्षीरसागर, विजय पारोधी, पंकज पडोले, परसुराम घोटे या कामगारांनी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी नितीन राऊत यांनी कामगारांशी चर्चा करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Web Title: Nitin Raut got to know the questions of the agitators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.