एन.एम.एम.एस. परीक्षेतील भवानजीभाई चव्हाणचे नऊ विद्यार्थी उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:07+5:302021-07-31T04:28:07+5:30
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे व आर्थिक साहाय्य व्हावे तसेच उच्च माध्यमिक ...
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे व आर्थिक साहाय्य व्हावे तसेच उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती एन.एम.एम.एस. परीक्षेला शाळेतील ३५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अनघा दामले, प्रतीक्षा दुर्योधन, सुहानी गेडाम, तक्षिका रामटेके, समृद्धी थुल, करुणा पाटील, अथर्व धोंगडे, सागर बावणे आणि जयंत करमरकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष चुनीलालभाई चव्हाण, कार्याध्यक्ष रमनिकभाई चव्हाण, उपाध्यक्ष ॲड. वामनराव लोहे, सचिव केशवराव जेनेकर, सहसचिव लक्ष्मणराव धोबे, मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे, पर्यवेक्षक राऊत मॅडम, सहारे, विधाते व शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या विद्यार्थ्यांना एस. एस. बुरेले, के.व्ही. मेश्राम, एस.एस. जयकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.