सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:39+5:302021-06-18T04:20:39+5:30

तालुक्यातील सिंदेवाही सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती रजिस्टर नंबर ६६४ च्या संचालक मंडळांनी विशेष सभा घेऊन अध्यक्षावर अविश्वास पारित ...

No-confidence motion against the Chairman of the Co-operative Agricultural Purchase and Sale Committee | सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव

सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव

googlenewsNext

तालुक्यातील सिंदेवाही सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती रजिस्टर नंबर ६६४ च्या संचालक मंडळांनी विशेष सभा घेऊन अध्यक्षावर अविश्वास पारित करण्याचा ठराव घेतला. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अधिकारी कुमारी एम.बी. उईके यांच्या उपस्थितीत बुधवारी सभेचे कार्यालयात आयोजन करण्यात आले. त्या सभेमध्ये १२ पैकी ९ संचालक सभासद उपस्थित झाले. अध्यक्ष केशव आडकूजी शेंडे यांच्या विरोधात संचालक विष्णूदास गजभिये यांनी ठरवाबाबत सभेत सुचविले व अरविंद हेमके यांनी अनुमोदन केले. त्यानंतर हातवर करून मतदानाचा हक्क बजावून आठ सदस्यांनी अध्यक्षावर अविश्वास ठराव पारित केला. या सभेला संचालक मंडळापैकी विष्णूदास गजभिये, श्यामराव गहाने, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, आनंद बनसोड, अरविंद हेमके, प्रकाश शिंदे, प्रकाश बन्सोड, निर्मला बोरकर यांच्या मतदानाने हा ठराव पारित करण्यात आला.

===Photopath===

170621\img_20210617_174611.jpg

===Caption===

सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती 664 अध्यक्ष यांचेवर अविश्वास ठराव पारित

Web Title: No-confidence motion against the Chairman of the Co-operative Agricultural Purchase and Sale Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.