Coronavirus in Chandrapur; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर "नो मास्क नो एंट्री "

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 08:26 PM2021-04-30T20:26:44+5:302021-04-30T20:27:09+5:30

Coronavirus in Chandrapur रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त केला असून गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांचा पत्ता हि लिहून घेण्यात येत आहे व मास्क न लावलेल्या प्रवाश्यांना प्रवेश देण्यात येत नाही.

"No Mask No Entry" at Ballarshah Railway Station | Coronavirus in Chandrapur; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर "नो मास्क नो एंट्री "

Coronavirus in Chandrapur; बल्लारशाह रेल्वे स्थानकावर "नो मास्क नो एंट्री "

googlenewsNext
ठळक मुद्देगुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची होतेय तपासणी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : कोरोना चा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे व राज्यात संचारबंदी चा माहोल असल्यामुळे याचा परिणाम रेल्वे प्रवाश्यांवर झाल्याचा दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त केला असून गुजरात, दिल्ली येथून रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांचा पत्ता हि लिहून घेण्यात येत आहे व मास्क न लावलेल्या प्रवाश्यांना प्रवेश देण्यात येत नाही. यासाठी मुख्य द्वारावर शिक्षक, टीटीआई व सुरक्षा जवानांची चमू बसविण्यात आली आहे. 

            रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांची चौकशी व नाव पत्ता घेण्यासाठी तहसील कार्यालयाने २४ तास आळीपाळीने  राजू वानखेडे,पी.डब्ल्यू.जेनेकर,एस.डी.गौरकार,डी.एल.कुबडे,सुभाष जुनघरे व विजय खोब्रागडे यांची नियुक्ती केली आहे.तर रेल्वे प्रशासनाने टीटीआई,व सुरक्षा दलाची नियुक्ती केली आहे.येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यांची कसून चौकशी केली जाते.जे प्रवाशी बिना तिकीट येतात त्यांना दंडित करण्यात येते.यामध्ये मास्क न लावलेला यांना प्रवेश नाही तर आरटीपीसीआर ची तपासणी न केलेला प्रवाशी यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात येत नाही.यामुळे रेल्वे प्रवाश्यांची गर्दी ओसरली आहे.

Web Title: "No Mask No Entry" at Ballarshah Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.