अन्य जिल्ह्यातून कुणालाही प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:40+5:30

जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

No one else has access to the district | अन्य जिल्ह्यातून कुणालाही प्रवेश नाही

अन्य जिल्ह्यातून कुणालाही प्रवेश नाही

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे सक्त निर्देश : धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव घरातच साजरे करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात, राज्यात व लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत आहे. अशा जिल्ह्यांमधून कुणालाही प्रवेश मिळणार नाही. पोलीस व प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही जिल्ह्यातून व राज्यातून प्रवेश करता येणार नाही. तसेच चंद्रपूरच्या नागरिकांना जाता येणार नाही. येणाऱ्या काळात सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम रद्द करावे. अजयपूर येथे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या पोलीस पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांशी व्हिडिओ संवाद साधताना त्यांनी शनिवारी अजयपूर येथे झालेल्या घटनाक्रमाबद्दल खेद व्यक्त केला. परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे, सण उत्सवांचे आयोजन आपल्या स्वत:साठी व आपल्या परिवारासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने चंद्रपूर शहर किंवा जिल्ह्यातील कोणत्याही गावात कोणीही कार्यक्रम आयोजित करण्याचे धाडस दाखवत असेल तर याबाबत वेगवेगळ्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर माहिती द्यावी. सध्या चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त आहे. पुढील काळात कोणतीही घुसखोरी होणार नाही. अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना विनाकारण त्याची किंमत चुकवावी लागेल, चुकीच्या पद्धतीने वागू नये, असे विनम्र आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान्याचे वितरण तसेच शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. पुढील ३० तारखेपर्यंत आपल्या घरातील कोणीच बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घरातील ज्येष्ठांनीदेखील घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

३२ पैकी २९ नमुने निगेटिव्ह
आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ४० नव्या नागरिकांची नोंद घेण्यात आली. त्यापैकी ३२ नागरिकांचे नमुने तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी २९ नमुने निगेटिव्ह आले आहे. तीन नमुन्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. जिल्ह्यात तीन हजार ५११ नागरिक निगराणीखाली आहेत. आतापर्यंत १४ दिवसांचे होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २३ हजार ३८१ आहे. ४२ नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.

विनाकारण फिरणाऱ्या ३५ जणांना अटक
जिल्ह्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या ३५ लोकांना अटक करण्यात आली असून १२० नागरिकांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २६० वाहने जप्त करण्यात आली असून लॉकडाऊन संपेपर्यंत परवानगीशिवाय रस्त्यावर वाहने चालविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य कोणतीही प्रतिष्ठाने उघडण्यास बंदी कायम असून नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळात घरीच रहावे, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.

सर्व वाहनांचे होणार निर्जंतुकीकरण
महानगरपालिकेने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शहराच्या हद्दीत येणाºया सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील ही कार्यवाही सुरू केली जाणार आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी व प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपुरात असलेल्या व रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
उपासमार होत असेल तर कळवा
नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा. क्वारंटाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२-२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: No one else has access to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.