१२ तालुक्यात आढळला नाही एकही रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:48+5:302021-06-29T04:19:48+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासांत ६५ जणांनी कोरोनावर मात केली. सात नवीन पॉझिटिव्ह आढळले तर सोमवारी एकाही बाधिताचा ...

No patient was found in 12 talukas | १२ तालुक्यात आढळला नाही एकही रूग्ण

१२ तालुक्यात आढळला नाही एकही रूग्ण

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासांत ६५ जणांनी कोरोनावर मात केली. सात नवीन पॉझिटिव्ह आढळले तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आढळलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३, गोंडपिपरी १, मूल २ तर सावली तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. चंंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, पोंभूर्णा, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८४ हजार ६५१ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ७९६ झाली आहे. सध्या ३२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ५४ हजार १८८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ६६ हजार ५८५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५२७ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी गाफिल राहू नये

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, गाफील राहू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: No patient was found in 12 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.