तंटामुक्त गाव समित्यांमध्ये राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:27 AM2020-12-22T04:27:28+5:302020-12-22T04:27:28+5:30

राजकारण नको नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला ...

No politics in dispute-free village committees | तंटामुक्त गाव समित्यांमध्ये राजकारण नको

तंटामुक्त गाव समित्यांमध्ये राजकारण नको

Next

राजकारण नको

नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमी व अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. त्यामुळे गृह विभागाने या समित्यांना आर्थिक व कायदेशीर बळ देण्याची मागणी नागरिकांनी केली.

नागभीड-वडसा मार्गावर

मनमानी प्रवासी वाहतूक

ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो आॅटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आॅटो चालकांची मनमानी वाढली. ब्रह्मपुरी येथून विविध कामांसाठी वडसा येथे जाणाºया नागरिकांची संख्या वाढली. परिवहन महामंडळाने या मार्गावर जादा बसेस सोडल्यास समस्या दूर होवू शकते.

दुर्गापूर-ऊर्जानगर मार्गावर

गतिरोधक बनवा

चंद्रपूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सहकारी संस्थांची

आर्थिक कोंडी

वरोरा : सहकारी संस्था बँकांनी कर्ज वितरण केले. मात्र, कोरोनामुळे वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला. वसुलीच होत नसल्याने सहकारी संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सरकारकडून निधीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने धोरण तयार करून आर्थिक पॅकेज देण्याची मागणी सहकारी संस्थांनी निवेदनातून केली आहे.

मामा तलावांसाठी

निधी मंजूर करावी

नागभीड : तालुक्यात ५० पेक्षा जास्त मामा तलाव आहेत. मात्र, तलावांच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून तुटपुुंजी तरतूद केली जाते. यातून तलावाच्या विकासाची काम करता येत नाही. अनेकांनी तलावांवर अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्यासाठी जि. प. आणि सिंचन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.

जळाऊ लाकूड

उपलब्ध करून द्यावे

सावली : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. बºयाच कुटुंबांकडे सिलिंडर नाही. कोरोनामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या निधीत कपात करण्यात आला. परिणामी, सिलिंडर वाटपाची योजना सध्या थंडबस्त्यात आहे. वन विभागाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील वन परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पीक विम्याच्या

रकमेची प्रतीक्षा

चंद्रपूर : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अति पावसामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे शेतकºयांना अडचण जात आहे. प्रशासनाने विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

कृषी विभागातील

रिक्त पदे भरावे

चंद्रपूर : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाºयांची दमछाक होत आहे़ राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या़ तसेच जिल्हा परिषदच्याही विविध योजना आहेत़ पण, या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही़ त्याचा अनिष्ट परिणाम अंमलबजावणीवर झाला. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत़ शासनाने रिक्त पदे भरावी, अशी मागणी आहे.

गतिरोधक नसल्याने

अपघाताचा धोका

कोरपना : येथील बसस्थानक परिसरात चंद्रपूर, वणी, आदिलाबाद आदी शहरातून मोठ्या प्रमाणात वाहनधारक येतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी गतीरोधक तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेने

नागरिक त्रस्त

चिमूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात होती. मात्र याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. मागील पंधरवाड्यात संततधार पावसाने रस्ता उखळला. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

Web Title: No politics in dispute-free village committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.