रस्त्यांची दुरुस्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:12+5:302021-03-26T04:28:12+5:30
विजेच्या लपंडाव, नागरिक त्रस्त चंद्रपूर : शहरात काही प्रभागांत विजेचा सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर ...
विजेच्या लपंडाव, नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात काही प्रभागांत विजेचा सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने अनेक उपकरणे बंद चालू होत असतात. तर काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. याबाबत येथील नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार करतात. मात्र वेळीच उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे.
बाजारात कचऱ्याचे ढीग
चंद्रपूर : येथील बंगाली कॅम्प भाजीबाजारामध्ये कचऱ्याचे ढीग घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांची भीती अधिकच वाढली आहे.
शहरातील ऑटोचालक संकटात
चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या संख्येने ॲाटोचालक आहे. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यामुळे भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचरा ट्राली दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वॉर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बेरोजगारांना उद्योगासाठी कर्ज द्या
चंद्रपूर : लॉकडाऊनंतर अनेकांनी गावचा रस्ता धरला आहे. मात्र आता हाताला काम नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे काही तरुणांनी पुन्हा शहराची वाट धरली आहे. मात्र शहरातही काम मिळत नसल्याचे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे भत्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे .
वीजबिलामुळे ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : लाॅकडाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी वीजबिल थकविले होते. दरम्यान, आता बिल भरण्यासंदर्भात महावितरणकरून वारंवार सूचना केल्या जात आहे. त्यामुळे बिल भरणे ग्राहकांना कठीण जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे अनेकांना बिल थकविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दिशादर्शक बोर्ड तुटला
चंद्रपूर : लाखो रुपये खर्चून चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे दिशादर्शनक, गाव तसेच अंतर असलेले बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र यातील अनेक बोर्ड तुटले असून, यामुळे बाहेरील नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
गतिरोधक ठरत आहे धोकादायक
चंद्रपूर : येथील हुतात्मा स्मारकाजवळील रस्त्यावर फायबर गतिरोधक लावण्यात आले आहे. मात्र यातील काही तुटले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे नव्याने फायबर गतिरोधक बसवावे, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण ‘जैसे थे’
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगावपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून, सध्या डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवल्यामुळे रस्ता ‘जैसे थे’ दिसत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.