दीड महिन्यात एकही विद्यार्थी पॅाझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:36+5:302021-01-08T05:32:36+5:30
चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा ५० टक्के तत्त्वावर २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ...
चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा ५० टक्के तत्त्वावर २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे हजेरीपटावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंद आहे. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ४३ हजार ६२३ विद्यार्थी शाळेत येत आहेत. सुदैवाने शाळा प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली नाही.
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्त्वावर ज्या विद्यार्थ्यांनी संमतिपत्र दिले त्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ४३ हजार विद्यार्थी शाळेत येत आहेत. शाळा प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याने सुदैवाने दीड महिन्यात जिल्ह्यात एकही कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आले नाही.
कोट
शासनाच्या नियमांप्रमाणे ५० टक्के तत्त्वावर शाळा सुरू आहेत. कोरोनासंदर्भात काळजी घेऊन शाळा सुरू आहेत. त्याचे फलित म्हणून दीड महिन्यात एकही शालेय विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाला नाही. त्यामुळे पालकही जागृत झाले असून पाल्यांना शाळेत पाठवत आहेत. दररोज ४५ हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती राहत आहे.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी
बॉक्स
शाळांतील उपस्थिती
तालुकासुरूउपस्थिती
चंद्रपूर १०२ ७५०७
भद्रावती ३३ २६२४
वरोरा ४९ ३१२३
बल्लारपूर ३२ १८२०
मूल ३३ ३०१६
राजुरा ४३ २०३४
कोरपना ३६ ३२६७
जिवती २६ ११७९
गोंडपिपरी १९ १६३२
पोंभुर्णा १५ ८२३
सावली २४ ३५८९
सिंदेवाही २६ २३१२
नागभीड ३० ३१९०
ब्रह्मपुरी ३५ ३७९३
चिमूर ४६ ३७१४