आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:57 AM2020-12-04T04:57:08+5:302020-12-04T04:57:08+5:30

वरोरा(चंद्रपूर) : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबातील सदस्य पल्लवी कौस्तुभ आमटे या गुरुवारी ...

This is not the time for Anandvan to decide | आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही

आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही

Next

वरोरा(चंद्रपूर) : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबातील सदस्य पल्लवी कौस्तुभ आमटे या गुरुवारी पहिल्यांदाच माध्यमासमोर आल्या. त्यांनी डाॅ. शीतल यांच्या मृत्यूने आमटे कुटुंबीयांवर मोठे अरिष्ट आल्याचे सांगून हे कुटुंबीय हळूहळू सावरत असल्याचे म्हटले आहे. आनंदवनबाबत निर्णय करण्याची ही वेळ नाही. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी सावरण्याची गरज असल्याचे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.

जे घडले ते फार दुर्दैवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवत्तादायी होती. तिने जे काही स्वप्न पाहिले, तिची पुढील दिशा जी काही होती, ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहे. डाॅ. शीतलच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. डाॅ. शीतलच्या मृत्यूने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. ही दुर्दैवी घटना आहे, असेही पल्लवी म्हणाल्या.

आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही मिळेल. आमटे व करजगी परिवार दु:खात आहे. करजगी परिवाराने आपल्या पद्धतीने आपले दु:ख व्यक्त केले आहे. आनंदवनबाबत निर्णय करण्याची ही वेळ नाही. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी यातून सावरण्यासाठी काही वेळ लागणार आहे. काळ योग्य पद्धतीने उत्तर देईल, असे पल्लवी आमटे म्हणाल्या.

Web Title: This is not the time for Anandvan to decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.