मूल शहरातील ओपन स्पेस जागेत लावलेल्या झाडाकडे न. प. प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:44+5:302020-12-17T04:52:44+5:30
मूल : पर्यावरणाचा समतोल राखता यावा नगर परिषद मूलच्या राखीव असलेल्या ६९ ओपन स्पेस जागेपैकी ३१ ठिकाणी झाडे लावण्यात ...
मूल : पर्यावरणाचा समतोल राखता यावा नगर परिषद मूलच्या राखीव असलेल्या ६९ ओपन स्पेस जागेपैकी ३१ ठिकाणी झाडे लावण्यात आली. यात लाखो रुपये खर्च करण्यात आले. झाडे लावल्यानंतर नगर परिषदने नियोजनबध्द आखणी करुन पाणी व इतर सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे झाडे सुव्यवस्थित होण्याला मदत झाली. मात्र आजच्या स्थितित लावलेल्या ओपन स्पेसमध्ये लावलेल्या झाडाकडे न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने झाडे सुकायला लागलेली आहे.
मूल शहरात असलेल्या ६९ ओपन स्पेस जागेपैकी ३१ ठिकाणी १२०० झाडे लावण्यात आली.
तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यानी नियोजनबध्द आखणी करुन वृक्षसंगोपन करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली. यात न.प.चे कर्मचारी मधुकर चौधरी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. स्वतंत्र यंत्रणा न.प.ने निर्माण केल्याने वृक्षारोपण चळवळीला बळ मिळाले होते. वेळोवेळी लक्ष घालुन वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी भेट दिल्याने त्याबाबत असलेल्या उणीवांची पुर्तता करण्यासाठी यंत्रणेला काम करता आले. याचा परिणाम असा झाला की लावलेल्या वृक्षाचे संगोपन व वाढ होण्यास मदत झाली. आज झाडे ओपन स्पेस जागेत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येते. यापूर्वी न.प.प्रशासनाने वृक्षाचे संगोपन करण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा नसल्याने वृक्ष लावलेल्या ठिकाण मृत अवस्थेत दिसायला लागले आहे. काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले मात्र योग्य पध्दतीने कुंपन न केल्याने सदर ठिकाणी वृक्षाविना दिसत आहेत.
कोट
मूल शहरात असलेल्या ३१ ओपन स्पेस जागेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी नगर परिषद प्रशासनाने विशेष यंत्रणा तयार केल्याने लावलेली झाडे चांगली झाली होती. मात्र काही महिन्यांपासून त्या झाडाकडे देखभाल करण्यासाठी कर्मचार्याना नियुक्त न केल्याने झाडे सुकायला लागली आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.
- विनोद कामडी नगरसेवक न.प.
शहरातील ओपन स्पेस जागेत वृक्षारोपण करण्यात आले. ती झाडे जगावीत यासाठी प्रशासन विशेष लक्ष घालत असते. या वृक्षाची देखभाल करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे असल्याने येत्या होणार्या सभेत या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
- सिध्दार्थ मेश्राम, मुख्याधिकारी न.प.मूल:-