नोटबंदी वर्षपूर्ती; जिल्ह्यात काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:04 AM2017-11-09T00:04:50+5:302017-11-09T00:05:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक नोटबंदी जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक नोटबंदी जाहीर केली. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी होरपळले गेले. या निर्णयाचा निषेध म्हणून चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी काळा दिवस पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपुरात जटपुरा गेट व गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले. जटपुरा गेट येथे राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. धरणे आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडपही काळ्या रंगाचा उभारण्यात आला होता. यावेळी जिल्हा काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर विधानसभा प्रमुख महेश मेंढे, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभासिंह गौर, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अनुसूचित जाती विभाग प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी, महिला प्रदेश महासचिव नंदा अल्लूरवार, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा जीवतोडे, शहर अध्यक्ष अनिता कथडे, विनोद संकत, अॅड. शाकीर मलक, प्रा. अनिल शिंदे, अनिल सुरपाम यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा सरकारच्या नोटबंदी व जीएसटी निर्णयाचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दुसरे आंदोलन गांधी चौकात महानगरपालिकेसमोर करण्यात आले. तत्पूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात नगरसेवक गजानन गावंडे, नगरसेवक अशोक नागापुरे, नगरसेवक कुशल पुगलिया, प्रविण पडवेकर, सकिना अन्सारी, ललिता रेवेल्लीवार, महेंद्र जयस्वाल, राजेश रेवेल्लीवार, बापू अन्सारी, भारत जंगम, कामगार नेत साईनाथ बुचे, देवेंद्र बेले व असंख्य कार्यकर्ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेसमोर मोदी सरकारच्या निषेधाचे व काळ्या दिवसाचे फलक हातात घेऊन केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
यासोबतच चिमूर, सिंदेवाही, सावली यासह इतर ग्रामीण भागातही बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळा दिवस पाळून केंद्र व राज्य शासनाचा निषेध केला.
राजुºयात काळा दिवस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ हाताला काळीपट्टी बांधून काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाच्या नोटबंदीचा निषेध नोंदविला. याप्रसंगी राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, नगराध्यक्ष अरूण धोटे, पंचायत समिती सभापती कुंदा अविनाश जेनेकर, जिल्हा परिषद सदस्या मेघा दिलीप नलगे, पं. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक देशपांडे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप नलगे, बांधकाम सभापती आनंद दासरी, नगरसेवक गजानन भटरकर, गीता रोहने, संदेश करमरकर, देविदास टिपले, राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सेवादलाचे अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचे विजय उपरे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, साजीद बियाबानी, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एजाज अहमद, सचिव अशोक राव, बामनवाडाचे सरपंच राजेश चौधरी, चिंचोलीचे माजी सरपंच वसंत ताजणे, धोपटाळाचे माजी सरपंच राजाराम येल्ला, धनराज चिंचोलकर उपस्थित होते.
पोंभूर्ण्यातही आंदोलन
पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे देऊन काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी नगरसेवक अतिक कुरेशी, गिरीधरसिंह बैस, मुरलीधर टेकाम, अशोक गेडाम, जयपाल गेडाम, पराग पुलकमवार, अशोक सिडाम, विजय वासेकर, निलकंठ नैताम, सुनिल कुंदोजवार, रामदास रामटेके आदी उपस्थित होते. तहसीलदारांमार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले.
ब्रह्मपुरीत निषेध
ब्रह्मपुरी : काँग्रेस, मजदूर काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवादल काँग्रेसच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे नोटबंदीचा काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी नारायणराव बोकडे, प्रा. जगनाडे, विजय तुमाने, गणी खान, गणेश कºहाडे, संजय हटवार, भगवान कुसरे, इनायत खान, बी.आर. पाटील, दर्शन नाकमोडे, नंदू गुड्डेवार, शालिक सहारे, वामनराव मिसार, दिवाकर मंडपे, योगीराज पारधी, विजय बनपूरकर, रामकृष्ण महाजन, काशिनाथ खरकाटे, रामटेके गुरुजी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.