खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:20 PM2019-04-02T22:20:14+5:302019-04-02T22:20:34+5:30

वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास शासनाने मनाई केला आहे. असे असतानाही अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करताना दिसून येतात. अशा डॉक्टरांवर चाप बसावा, या उद्देशाने चंद्रपूर येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली असून प्रमाणपत्र सदर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Notice to 58 Medical Officers Who Have Private Practice | खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या ५८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

Next
ठळक मुद्देमोठा झटका : जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास शासनाने मनाई केला आहे. असे असतानाही अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करताना दिसून येतात. अशा डॉक्टरांवर चाप बसावा, या उद्देशाने चंद्रपूर येथे नव्याने रुजू झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली असून प्रमाणपत्र सदर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रमाणपत्र सादर केल्यानंतर खासगी प्रॅक्टिस करताना कोणताही डॉक्टर आढळून आल्यास त्याच्यावर कठोर करवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याची उत्तम सेवा मिळावी, यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हा मुख्यालयी असावा, असा शासनाचा अद्यादेश आहे. मात्र बरेच वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसून इतर ठिकाणाहून ये-जा करतात. परिणामी बºयाचदा रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासोबत डॉक्टरांनी आपले कर्तव्य प्रमाणीकपणे बजवावे, कुठेही खासगी प्रॅक्टिस करु नये, यासाठी वैद्यकीय अधिकाºयांना मूळ वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) देण्यात येतो. तरीसुद्धा डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करताना दिसून येतात. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना ‘मी कोणतीही खासगी प्रॅक्टिस करत नाही.
खासगी प्रॅक्टिस करताना आढळून आल्यास प्रशासकीय कार्यवाहीस पात्र राहीन’ अशा आशयाचे प्रमाणपत्र लिहून घेतले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या या निर्णयाने खासगी प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

हजेरीपत्रक सादर करा
तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी स्वत:चे हजेरीपत्रक दर महिन्यांच्या २१ तारखेच्या आत तसेच प्रमाणपत्र १६ ते २० तारखेच्या आत जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे जमा करायचे आहेत. यामध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी राखिव ठेवला आहे. या तारखेच्या आत हजेरीपत्र जमा न झाल्यास संबंधित अधिकाºयांचे वेतन पुढील महिन्यात करण्याचा इशाराही वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे.
आरोग्य केंद्रात बसवल्या थम्ब मशीन
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील थंम्बस मशीन अपडेट करायच्या होत्या. त्यामुळे त्या बंद स्थितीत होत्या. दरम्यान अनेक डॉक्टर केव्हाही रुग्णालयात जाणे येणे करीत होते. मात्र नुकतेच संबंधित विभागाच्या कर्मचाºयांकडून सर्व थंम्ब मशीन अपडेट करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात वितरीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता डॉक्टरांना व इतर कर्मचाºयांना वेळेवर रुग्णालयात जावे लागणार आहे.

वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून हजेरीपट व प्रमाणपत्र मागण्यात आले आहे. प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ते कुठेही खासगी प्रॅक्टिस करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- राजकुमार गहलोत
जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Notice to 58 Medical Officers Who Have Private Practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.