अनुपस्थित राहणार्या कर्मचार्यांना नोटीस
By admin | Published: May 22, 2014 11:45 PM2014-05-22T23:45:47+5:302014-05-22T23:45:47+5:30
नगर परिषद वरोराचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याच्या काही तक्रारी अधिकार्यांकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी अचानक वरोरा न.प. च्या प्रत्येक विभागात भेट दिली.
वरोरा: नगर परिषद वरोराचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याच्या काही तक्रारी अधिकार्यांकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी अचानक वरोरा न.प. च्या प्रत्येक विभागात भेट दिली. या भेटीमध्ये कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असणार्या पाच कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे दांडी मारणारे व उशीरा येणार्या कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वरोरा नगर परिषद कार्यालयात कर्मचार्यांकरिता वेळ दर्शक यंत्र आहे. या यंत्रावर दिलेल्या वेळेत अंगुली लावून व रजिस्टरवर स्वाक्षरी करून अनेक कर्मचारी आपल्या विभागात उपस्थित राहत नसल्याचे समजते. दिवसभर कार्यालयात उपस्थित राहायचे नाही व संध्याकाळी वेळदर्शक यंत्रावर अंगुली लावून निघून जात होते. २० मे रोजी न.प. चे मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी दुपारी ३.३० वाजता अचानकपणे वरोरा न.प. च्या प्रत्येक विभागास भेट दिली. त्यावेळी न.प. पाणी पुरवठा विभागातील अभियंता निलेश तरपाचे, कर्मचारी किरण वाघमारे व वसुली विभागातील भारत पातालबंसी, शैला कवाडे, अंकुश घोरपडे हे पाच कर्मचारी आढळून आले नाही. कार्यालयात अनुपस्थित असल्याबाबत अर्जही ठेवलेला आढळून आला नसल्याने त्या पाचही कर्मचार्यांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.(तालुका प्रतिनिधी)