बोगस बियाणे देणाऱ्या चार कंपन्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 05:00 AM2022-07-04T05:00:00+5:302022-07-04T05:00:20+5:30
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. मात्र, ते बियाणेच उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा भुर्दंड बसला. एक नव्हे तर चक्क १३७ शेतकऱ्यांनी घेतलेले विविध कंपन्यांंचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्या तक्रारींच्या आधारावर चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना कृषी विभागाने नोटीस बजावून त्यांच्याकडे बियाण्याबाबतची कागदपत्रे मागितली आहेत.
जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढत आहे. त्यामुळे शासकीय कंपन्यांसह विविध प्रकारच्या खासगी कंपन्या बाजारपेठेत आल्या आहेत यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या कंपन्यांबाबत १३७च्या जवळपास शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. कृषी विभागा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत चारही कंपन्यांना नोटीस बजावली. त्यात बियाणे कुठे तयार झाले, बियाणे तयार होताना कुणी बघितले, कोणाच्या निगराणीत बियाण्यांची पॅकिंग झाली, या संदर्भातील माहिती तसेच संपूर्ण कागदपत्रे मागितली आहेत.
शेतकऱ्यांना जावे लागणार ग्राहक न्यायालयात
- प्रयोगशाळेने बोगस बियाणे असल्याचा अहवाल दिल्यास त्या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना कन्झुमर कोर्टात जावे लागेल. त्यानंतरच त्यांना बोगस कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळू शकते. त्या अहवालाच्या आधारावर कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करेल.
बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. संशयीत बियाणांचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच चतुर्भुज, करिष्मा, सम्राट, बसंत या चार कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून कागदपत्रे मागवून घेतले आहेत. जर प्रयोगशाळेतील अहवालात बियाणे दोषपूर्ण आढळून आल्यास कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे.
-भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर