उपकेंद्रातच मिळणार आता १२ आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:55 PM2018-10-29T22:55:20+5:302018-10-29T22:55:51+5:30

गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे.

Now 12 health services will be available in sub-center | उपकेंद्रातच मिळणार आता १२ आरोग्य सेवा

उपकेंद्रातच मिळणार आता १२ आरोग्य सेवा

Next
ठळक मुद्दे७५ उपकेंद्रांची निवड : जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाचा ताण कमी होणार

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे. यामुळे योग्य उपचार मिळत नसल्यामुळे येथील यंत्रणेला रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य उपकेंद्रांचे रुपांतर हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या ठिकाणी तब्बल १२ आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णांना गावातच मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ३३९ पैकी ७५ आरोग्य उपकेंद्रांचे रुपांतर हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये कायमस्वरुपी वेद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या सेंटरसाठी ३७ वैद्यकीय अधिकाºयांची भरती होऊन रूजू झालेले आहे. त्यांचे चंद्रपूर प्रशिक्षणही सुरू आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे वैद्यकीय अधिकारी संबंधित हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रूजू होणार आहे. त्यांच्या सोबतीला स्टाफ नर्स व चार आरोग्यसेविका असणार आहे. ही मंडळी ज्या सेंटरमध्ये रूजू होईल. त्या हद्दीत येणाºया नागरिकांना १२ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी आपल्या सेंटरच्या क्षेत्रातील सर्व कुटुंबांची आरोग्य विषयक माहिती आॅनलाईन पद्धतीने संग्रही करणार आहे. यानंतर त्या कुटुंबातील एखादा रुग्ण उपचारासाठी आल्यास जिल्हा वा ग्रामीण रुग्णालयाच्या तज्झ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत सल्ला घेऊन गावातच त्या रुग्णावर आवश्यक तो उपचार केला जाणार आहे. यामुळे रुग्णांना जिल्हा वा ग्रामीण रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. आणि या रुग्णालयांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

या आरोग्य सेवा मिळणार
आरोग्य उपकेंद्राचे हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रुपांतर झालेल्या उपकेंद्रात खालील १२ आरोग्य सेवा मिळणार आहे. यामध्ये माता व बाल आरोग्य, असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणी, मधुमेह, रक्तदाब, उच्चरक्तदाब, कर्करोग, पक्षाघात, आयुष पारंपरिक पद्धती अंमलबजावणी, असहाय्य रुग्णांची काळजी, किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी, साथरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व अन्य आरोग्य सेवांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ आरोग्य उपकेंद्रांचे हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे. पंचायत समिती स्तरावर वैद्यकीय अधिकाºयांची भरती घेण्यात आली. यामध्ये ३७ डॉक्टर्स रुजू झाले आहे. त्यांचे प्रशिक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिक विद्यापीठ मान्यता प्राप्त मध्यसेवा प्रदाता प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे. प्रशिक्षण संपताच हे वैद्यकीय अधिकारी संबंधित उपकेंद्रात रूजू होणार आहे. यानंतर तेथेच १२ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक. चंद्रपूर.

Web Title: Now 12 health services will be available in sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.