आता व्हा आत्मनिर्भर, १५० जणांना मिळणार १० लाखांपर्यंतचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:20+5:302021-09-07T04:34:20+5:30

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच ...

Now become self-reliant, 150 people will get a grant of up to Rs 10 lakh | आता व्हा आत्मनिर्भर, १५० जणांना मिळणार १० लाखांपर्यंतचे अनुदान

आता व्हा आत्मनिर्भर, १५० जणांना मिळणार १० लाखांपर्यंतचे अनुदान

Next

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ अशी पाच वर्षे राबविली जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यात १५० जणांना अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात ५२ प्रस्ताव आले आहेत.

केंद्र पुरस्कृत सूक्ष्म खाद्यउद्योग उन्नयन योजना देशात राबिवण्यात येणार आहे. ही योजना असंघटित व नोंदणीकृत नसलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगासाठी असून ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदान, बॅंंडिक व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मसाला उद्योग, हळद प्रक्रिया उद्योग आदींसाठी योजना लागू राहणार आहे. या माध्यमातून रोजगाराच्या संधीही जिल्ह्यात प्राप्त होणार आहे.

बाॅक्स

असा करा अर्ज

जिल्ह्यात १५० जणांना या योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५२ जणांनी अर्ज सादर केले आहे.

योजनेच्या लाभासाठी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन प्रस्ताव ऑनलाईन सादर करावा लागतो.

बाक्स

कोणाला घेता येणार लाभ?

जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट आणि बचतगटांना या केंद्राच्या सहाय्याने सुरू असलेल्या योजनेचा लाभ घेता येतो. ज्यांच्याकडे लघुउद्योग सुरू आहे. त्या उद्योगांना वाढविण्यासाठीदेखील कर्ज घेता येणार आहे. त्यात ३५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय उद्दिष्ट

चंद्रपूर -०६

बल्लारपूर०६

मूल-११

सावली ०६

वरोरा-१२

चिमूर १६

नागभीड १२

ब्रह्मपुरी १२

सिंदेवाही१२

राजुरा१२

कोरपना०६

जिवती०६

गोंडपिपरी१२

पोंभुर्णा-०६

एकूण१५०

कोट

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात आलेल्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून तपासणी करून प्रस्तावांची बँकांकडे कर्जासाठी शिफारस करण्यात येणार आहे. प्रस्ताव आल्यानंतर संबंधितांकडे कृषी अधिकारी तसेच पथकांकडून पाहणी केल्यानंतर प्रस्ताव पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल.

-रवींद्र मनोहरे

कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी पीएमएफएमई

Web Title: Now become self-reliant, 150 people will get a grant of up to Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.