आता महाविद्यालयीन वर्गही राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:57+5:302021-04-05T04:24:57+5:30
आता शैक्षणिक वर्ग केवळ ऑनलाईन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित आवश्यकतेनुसार महाविद्यालयात ...
आता शैक्षणिक वर्ग केवळ ऑनलाईन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियमित आवश्यकतेनुसार महाविद्यालयात उपस्थित राहू शकणार आहे. शिक्षक तसेच प्राध्यापक महाविद्यालयात येऊन ऑनलाईन वर्ग घेतील तसेच बारावी बोर्ड किंवा महाविद्यालयीन परीक्षेकरिता शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करतील. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे
पालन करणे सर्वसंबधितांना बंधनकारक राहणार आहे.
बाॅक्स
होणार कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची कोणतेही व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी अंमलबाजवणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.