आता ३०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:35+5:302021-08-17T04:33:35+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना बाधा झाली तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची ...

Now let it be done in the presence of 300 people | आता ३०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान

आता ३०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना बाधा झाली तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शासनाने काही निर्बंध हटविले आहे. यामध्ये आता लग्नसमारंभाला २०० जण उपस्थिती राहूू शकणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे वर-वधूकडील मंडळी, लाॅन, मंगल कार्यालय संचालक, बँक पथकासह यासह अन्य व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स

बँड पथकांसह मंगल कार्यालय संचालकांना दिलासा

मागील दीड वर्षांपासून मंगल कार्यालय संचालक, कॅटरर्स व्यावसायिकांसह बँक पथकही अडचणीत आले होते. दरम्यान, लग्नसमारंभासाठी २०० नागरिकांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यवसायाला उभारी येईल, असे मत लग्नसमारंभ कार्यक्रमासाठी जुळलेल्या व्यावसायिकांचे आहे. बँड पथकांनाही रोजगार मिळणार असल्याने या दोन्ही व्यावसायिकांंतील मंडळीमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.

बाॅक्स

या आहे लग्न तिथी

दक्षिणायन आरंभ झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तच नसतात. परंतु चातुर्मासात ज्यांना अत्यंत आवश्यक असेल त्यांच्यासाठी मुहूर्त म्हणून ऑगस्ट महिन्यात १८, २०, २१, २७ नवरात्रानंतर ऑक्टोबर महिन्यात ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१ आणि २४ या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.

बाॅक्स

नियम तोडल्यास कारवाई

कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. मंगल कार्यालय, लाॅनमध्ये लग्नसमारंभाला एकत्रित आल्यानंतर मास्क लावणे, सॅनिटायझर लावणे गरजेचे असून गर्दी टाळणे आवश्यक आहे. अन्यथा दंड तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

बाॅक्स

यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोरोना संकट होते. त्यामुळे लग्नसमारंभ पुढे करण्याचे अनेकांनी ठरविले आहे. ज्यांनी लग्नतारखा पुढे ढकलल्या आहेत किंवा लग्न जुळणे असून लग्नसमारंभ आयोजित केला असेल त्यांना चालू महिन्यात तसेच ऑक्टोबर महिन्यात लग्न करता येईल.

- शंकर नाईक, पुरोहित

Web Title: Now let it be done in the presence of 300 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.