आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६०५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:32+5:302020-12-26T04:23:32+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ५० कोरोनाबाधित रुग्णांची ...

Now the number of active patients is 605 | आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६०५

आता अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६०५

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी ६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ५० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ७१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार १०८ झाली आहे. सध्या ६०५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजार ११८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४३ हजार ५३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये जांभूळघाट येथील ७१ वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील ६४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शुक्रवारी बाधित आलेल्या ५० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २८, चंद्रपूर तालुका १०, बल्लारपूर एक, भद्रावती चार, नागभीड एक, सिंदेवाही एक, मूल एक, चिमूर एक व वरोरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Now the number of active patients is 605

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.